हॅलो कृषी ऑनलाईन : अल्बिनो म्हणजेच पूर्ण पांढऱ्या रंगाचे प्राणी आपण यापूर्वी पहिले असतील. मात्र मध्यप्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातील सिरोज येथे माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे दिसणारं बकरीचं पिल्लू जन्माला आलं आहे. त्यामुळं तिथे या पिलाला पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी होतीये. शिवाय सोशल मीडियावर देखील या बकरीच्या पिलाच्या फोटोने चांगलाच धुमाकूळ घातलाय.
हेड डिस्पेप्सिया आजाराने ग्रस्त
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , मध्य प्रदेशातल्या सरोज येथील नवाब खान नावाच्या एका पशुपालकाच्या बकरीने शुक्रवारी या वेगळ्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला आहे. या कोकरुचा चेहरा एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्याप्रमाणेच दिसत आहे, हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं मते, ‘हेड डिस्पेप्सिया’ या दुर्मिळ आजारामुळे या कोकरुचा असा जन्म झाला आहे. तसेच, अशी पूर्ण वाढ न झालेली पिल्लं जास्त काळ जगत नाहीत. शिवाय या कोकराच्या विचित्र चेहऱ्यामुळे या कोकराला दूधही पीता येत नाहीये. त्यामुळे या कोकराला सिरिंजद्वारे दूध पाजलं जात आहे.
🐐 #नवाब_खान_की_बकरी ने एक बच्चे (Goat born with human like face) को जन्म दिया है जिसका चेहरा इंसानों जैसा है.#मध्यप्रदेश के विदिशा में सिरोंज तहसील के सेमल खेड़ी गांव ने इन दिनों वहां के नागरिकों को हैरान कर दिया है.
👁️बकरी की आंखें अजीबोगरीब हैं👁️#अजब_अनोखा pic.twitter.com/5j4aaoDdur— 𝐕𝐢𝐛𝐡𝐮𝐭𝐢 𝐒𝐢𝐧𝐠𝐡 (@bkn_rj14) November 16, 2022
सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ व्हायरल
या पिल्लाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितले की, या बकरीच्या कोकरुची पूर्णपणे वाढ झाली नाही. अशा अविकसित पिल्लाचं आयुष्य कमी असतं. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. मानवी चेहऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या या बकरीच्या पिल्लाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केले आहेत. शिवाय आजूबाजूची गावं आणि जिल्ह्यातील लोकसुद्धा या बकरीच्या कोकरुला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.