हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना एअर टॅगिंग (Cattle Ear Tagging) केल्याशिवाय 1 जून पासून जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नसल्याच्या सूचना राज्याच्या (Maharashtra) पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) देण्यात आली होती. या माध्यमातून भारत पशुधन या प्रणालीवर देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट (Cattle Updated Information) करण्यात येणार आहे. पण विभागाकडून मोहीम राबवण्यात आल्यानंतरही अनेक शेतकर्यांनी जनावरांना एअर टॅगिंग केले नसल्याने आता जनावरांच्या बाजारामध्ये आलेल्या जनावरांची एअर टॅगिंग (Cattle Ear Tagging) करण्यात येणार आहे.
जनावरांची खरेदी विक्री (Buying And Selling Of Animals) करताना शेतकर्यांची फसवणूक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे एअर टॅगिंग करुन त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. यामुळे विशिष्ट भागातून जनावरांची खरेदी-विक्री वाढणे, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ या अनुषंगाने निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणार्या जनावरांची खरेदी विक्री टॅगिंग (Cattle Ear Tagging) करुन झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणारे साथ रोग प्रादुर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
पशुधनाच्या बाजारामध्ये (Animal Market) खरेदी-विक्रीसाठी करण्यात आलेल्या पशुधनाची माहिती विक्री करण्यात आलेल्या संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागास सादर करणे तसेच खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग (Cattle Ear Tagging) करुन नोंदी अदयावत करणेबाबत निर्देशित केलेले आहे. तसेच बाजारामध्ये पशुधनाची ने-आण करताना कोणत्याही प्रकारची क्रूरता होणार नाही याची देखील दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात सुमारे 150 पेक्षा अधिक जनावरांचे बाजार भरतात ज्यातील 15 बाजार सर्वात मोठे असून त्यामध्ये 5000 पेक्षा अधिक पशुधनाची खरेदी-विक्री करण्यात येते. 80% पशुधनाच्या बाजारांमध्ये कमी, मध्यम संख्येच्या पशुधनाची खरेदी-विक्री केली जाते. पण बाजारात एअर टॅगिंग नसलेले पशुधन असल्यास त्यांची तिथेच एअर टॅगिंग केली जाणार आहे. या संदर्भात पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता ज्या जनावरांना एअर टॅगिंग (Cattle Ear Tagging) नाही अशा जनावरांना थेट बाजारात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.