शेतकऱ्यांना शेतावरच बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून द्यावे; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

bacchu kadu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला-हॅलो कृषी | करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने सगळीकडे हा-हाकार माजवला आहे. सर्व ठिकाणे व दुकाने बंद असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि सर्वांचेच हाल होत आहेत. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके इत्यादी कृषी संबंधित गोष्टी त्यांच्या शेतावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी यंत्रणेस निर्देश दिले आहेत. यापुढे कृषीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोच करून देण्यात याव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शासन वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे कार्यक्रमात घेत असते. पण ते कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे, शासनाने पिकांसाठी जाहीर केलेले कार्यक्रम विशेषता सोयाबीन लागवडीसाठीसाठी जारी केलेल्या चतुसूत्री कार्यक्रम शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी यंत्रणेने काम करावे. व शेतकऱ्यांना सोप्या भाषेत तो कार्यक्रम समजून सांगावा. असे पालक मंत्री बच्चू कडू यांनी बैठकीमध्ये सांगितले.

सन 2021-22 च्या खरीप हंगामासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी, पालकमंत्री बच्चू कडू बोलत होते. या बैठकीसाठी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त इत्यादी सहभागी झाले होते. प्रत्येक गावातील कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आणि बँक कर्मचारी हे वेळेनुसार गावात हजर असले पाहिजेत. आणि त्यांच्यामार्फत या ग्रामीण विकास कार्यक्रमाचे राबविण्यात यावे असे निर्देश पालक मंत्री यांनी दिले.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7