आता केवळ 6.95% दराने मिळवा SBI होम लोन, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । आपले स्वतःचे घर हे स्वप्न अनेकांचे असते. पण बऱ्याचदा पैशांमुळे हे स्वप्न पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. अनेक बँकाच्या होम लोनच्या जास्त व्याजदरामुळे होम लोन ही घेण्यास ग्राहक घाबरत असतात. पण आता एसबीआय ने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी कमी ६.९५%  व्याज दरात होम लोन उपलब्ध करून दिले आहे. कमी व्याजदर, कमी प्रोसेसिंग फी, आधी पैसे परत केल्याची कोणतीच फी नाही, कोणतेच लपवलेले चार्जेस नाहीत, ३० वर्षापर्यँत कर्ज फेडण्याची मुदत, ओव्हरड्राफ्ट म्हणून उपलब्ध होम लोन आणि महिला कर्जदारांसाठी विशेष सवलत अशी या लोन ची वैशिष्ट्ये आहेत. 

 https://homeloans.sbi/ या वेबसाईटवर जाऊन, YONO ला लॉग इन करून, जवळच्या एसबीआय शाखेत भेट देऊन प्रत्यक्ष किंवा १८०० ११ २०१८ या क्रमांकावर तसेच ९२२३५८८८८८ या नंबरवर एसएमएस करून या लोनसाठी हे लोन घेता येऊ शकते. आतापर्यंत ३० लाख कुटुंबांचे घर घेण्याचे स्वप्न या लोनने पूर्ण केले आहे. यासाठी अटीही अगदी सध्या आहेत, कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ७० वर्षापर्यंतचे लोक या लोनसाठी अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असणे गरजेचे आहे. ३० वर्षाच्या मुदतीत हे कर्ज फेडावे लागते. 

कर्मचारी ओळखपत्र, प्रॉपर्टी पेपर, अकॉउंट स्टेटमेंट, तीन महिन्यांची सॅलरी स्लिप, बिझनेस च्या पत्त्याचे ओळखपत्र, तीन वर्षाचे आयटी रिटर्न, मागच्या तीन वर्षांची बॅलन्स शीट आणि नफा आणि तोटा तपशील, बिझनेस लायसन्स पुरावा, टीडीएस प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र ही  कागदपत्रे आवश्यक असतात. याबाबतची अधिक माहिती https://homeloans.sbi/ या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –

किसान क्रेडिट कार्ड’द्वारे शेतकऱ्यांना मिळेल स्वस्त व्याजदराने कर्ज; असा करा अर्ज

‘यास’ चा महाराष्ट्रावर परिणाम, या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

शेतकऱ्यांनो अजूनही जुन्या दरानेच खतांची खरेदी करताय ? थांबा..! जाणून घ्या कोणत्या कंपनीचा किती आहे दर ?

किसान क्रेडिट कार्ड: जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डच्या फायद्यापासून ते मिळविण्यापर्यंतची संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांनो तुमच्याही शेतात शेततळे काढण्याचा विचार करताय ? जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!