Krushi Sevak Bharti 2023 : कृषी विभागामध्ये 2000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, शेतकऱ्यांच्या पोरांना सरकारी नोकरीची संधी

Krushi Sevak Bharti 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र सरकारकडून कृषी विभागाअंतर्गत रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी भरती होणार आहे. कृषी आयुक्तालयाकडून याला दुर्जोरा देण्यात आले आहे. यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

या विभागांमध्ये होणार भरती

  1. नागपूर विभाग – 448 जागा – जाहिरात pdf 
  2. पुणे विभाग – 188 जागा  – जाहिरात pdf 
  3. नाशिक विभाग – 336 जागा  – जाहिरात pdf 
  4. औरंगाबाद विभाग – 196 जागा – जाहिरात pdf 
  5. लातूर विभाग – 170 जागा  – जाहिरात pdf 
  6. कोल्हापूर विभाग – 250 जागा – जाहिरात pdf 
  7. कोकण ठाणे विभाग -294 जागा  – जाहिरात pdf 
  8. अमरावती विभाग – 227 जागा  जाहिरात pdf 
  9. कोल्हापूर विभाग – 250 जागा  जाहिरात pdf 

तुम्हाला जर कृषी सहा सहसंचालक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता याबाबतची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या Www.krishi.maharastra.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केली यानुसार उमेदवाराने त्याचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही त्यामुळे ही गोष्टी तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे उमेदवारांनी अपलोड करणे आवश्यक आह. जर तुम्ही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर तुम्ही यापासून वंचित देखील राहू शकता. त्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या ठिकाणाहून तुम्ही याबाबत अधिकची माहिती घेऊ शकता. यामध्ये लातूर – १७०, नाशिक – ३३६, छत्रपती संभाजीनगर – १९६, तर कोल्हापूरमध्ये – २५० जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक फॉर्म भरणे गरजेचे आहे.

दरम्यान, याबाबतच्या प्रस्तावामध्ये प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. त्यामुळे ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देता आलेली नाही. मात्र ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

वेतनमान : रु.16000/- प्रति महिना

अर्ज फी :

  • जनरल/ओबीसी: रु.400/-
  • मागासवर्गीय रु.200/-

परीक्षेचा नमुना : 200 गुणांसाठी संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात