Chana Market : हरभऱ्याचे बाजारभाव अचानक वाढले, ‘इतका’ मिळतोय दर; जाणून घ्या एका क्लिकवर

Chana Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chana Market : मागच्या काही दिवसापासून हरभऱ्याचे दर कमी आहेत. मात्र आता हरभऱ्याच्या दराने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मागच्या तीन आठवड्यापासून हरभऱ्याचे भाव क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढले आहेत. कमी असलेले भाव अचानक वाढल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. देशांमध्ये विक्रमी उत्पादन होऊन आणि नाफेडकडे उच्चांकी स्टॉक असून देखील हरभरा भाव वाढत आहेत. हरभऱ्याचे दर आता पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांनी हरभरा विकण्यास केली सुरुवात

मागच्या काही दिवसापासून हरभऱ्याचे दर खूप कमी होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते. हरभऱ्याचे दर वाढतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता. मात्र कधी ना कधी हरभऱ्याचे भाव वाढणार अशी आशा देखील शेतकऱ्यांना होती. याच आशेने शेतकऱ्यांनी हरभरा साठवणूक करून ठेवला होता आता हरभऱ्याचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारामध्ये हरभरा विक्रीसाठी देखील आणला आहे.

असे अनेक शेतकरी होते ज्यांनी हरभऱ्याचे भाव वाढत नसल्याने हरभरा विकून टाकला होता मात्र सध्या बाजारामध्ये हरभऱ्याची आवक बाजारामध्ये खूपच कमी जपोटे आहे आता सध्या सण देखील मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळी, दसरा हे सण आले आहेत. या सणांना डाळी मोठ्या प्रमाणात लागतात त्यामुळे हरभऱ्याला मागणी वाढली आहे आणि बाजारातील आवक कमी झाली आहे. त्यामुळे सध्या हरभऱ्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयांचा भाव मिळत आहे.

इथे चेक करा हरभऱ्याचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हरभऱ्याचे रोजचे बाजार भाव पाहिचे असतील तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा त्यामध्ये बाजार भाव असा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुम्ही हरभऱ्याचे बाजार भाव पाहू शकतात. त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील भाव पाहू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.

सध्या पावसाने देखील चिंता वाढवली आहे यामुळे रब्बी हंगामात उत्पादन किती होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हरभरा भावाला आधार मिळत असल्याचे देखील जाणकारांनी सांगितले आहे. तर हरभऱ्याचे भाव अजून वाढू शकतात असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी साठवून करून ठेवलेला हरभरा बाजारात विक्रीसाठी नेला आणि बाजारात त्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली तर हरभऱ्याचे भाव पुन्हा कमी होऊ शकतात असे देखील अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/08/2023
उदगीरक्विंटल48540060405720
दौंडलालक्विंटल1500050005000
औसालालक्विंटल32500057115102
अजनगाव सुर्जीलोकलक्विंटल37460057005200
19/08/2023
पुणेक्विंटल37590062006050
बार्शी -वैरागक्विंटल3520058655200
पुसदक्विंटल30485057905600
उदगीरक्विंटल10550061005800
कारंजाक्विंटल25562557955625
नांदूराक्विंटल25482155605560
राहताक्विंटल1400040004000
चिखलीचाफाक्विंटल15450055005000
वाशीमचाफाक्विंटल450535058005500
मलकापूरचाफाक्विंटल102480059205575
अकोलाकाबुलीक्विंटल2142301423014230
औरंगाबादकाबुलीक्विंटल1500050005000
तुळजापूरकाट्याक्विंटल15560056005600
येवलालालक्विंटल4535066705500
धुळेलालक्विंटल3513552005135
बीडलालक्विंटल8480055315206
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल36570059005800
औराद शहाजानीलालक्विंटल10564058505745
कळंब (उस्मानाबाद)लालक्विंटल3500055565300
जालनालोकलक्विंटल95480057035500
अकोलालोकलक्विंटल200300058354840
अमरावतीलोकलक्विंटल663550059805740
परभणीलोकलक्विंटल23550059005800
आर्वीलोकलक्विंटल23500058005600
नागपूरलोकलक्विंटल120480056155411
उमरेडलोकलक्विंटल15450058005500
जामखेडलोकलक्विंटल7400048004400
कोपरगावलोकलक्विंटल6410056605000
गेवराईलोकलक्विंटल19465056135500
लोणारलोकलक्विंटल25480055765188
मेहकरलोकलक्विंटल110500057305500
नांदगावलोकलक्विंटल3500060605500
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल3470057004950
दुधणीलोकलक्विंटल23540060556050