Red wine : वाईन कशी बनवली जाते? एका बाटलीसाठी किती द्राक्षे लागतात? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Red wine
Red wine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Red wine : दारूचे अनेक प्रकार आहेत. बिअर, व्हिस्की, वोडका, शॅम्पेन आणि वाईन. त्यापैकी वाईन सर्वात खास मानली जाते. त्याला लक्झरी अल्कोहोल देखील म्हटले जाते. वाइन सामान्यतः द्राक्षांपासून बनविली जाते. मात्र वाईन बनविण्यासाठी वाईनच्या बाटलीत किती द्राक्षे वापरली जातात आणि वाइन कशी बनवली जाते. याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत ही माहिती वाचा.

वाईनच्या बाटलीत किती द्राक्षे वापरली जातात?

वाइनचे अनेक प्रकार आहेत, परंतु रेड वाईन ही जास्त लोकप्रिय आहे. ही रेड वाईन द्राक्षापासून बनवली जाते. माहितीनुसार लाल आणि काळ्या द्राक्षांपासून सर्वोत्तम वाइन तयार केली जाते. वाइनची एक बाटली तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्षांची संख्या बाटलीच्या आकारावर आअवलंबून असते. उदाहरणार्थ, जर बाटली 75 मिलीलीटरची असेल, तर तेवढी वाइन बनवण्यासाठी सुमारे 1 किलो द्राक्षे लागतात. हे प्रमाण द्राक्षांचा आकार आणि त्यामध्ये असलेल्या रसावरून देखील निश्चित केले जाते. (Red wine)

द्राक्षापासून वाईन कशी बनते?

द्राक्षांपासून वाइन बनवण्याची सात टप्पे आहेत. सर्वप्रथम, तुम्हाला वाइन बनवण्यासाठी द्राक्षे तोडावी लागली. त्यानंतर द्राक्षाचा यंत्राद्वारे रस काढावा लागेल. जेव्हा द्राक्षांचा रस बाहेर येतो तेव्हा तो आंबायला ठेवला जातो. यासाठी लोक मोठे लाकडी डबे वापरतात. त्याच वेळी, काही लोक बॅरल्स देखील वापरतात. द्राक्षांचा रस आंबला की तो रस स्वच्छ करून काढावा लागतो. त्यानंतर ते बाटल्यांमध्ये विकण्यासाठी तयार केले जाते. फर्मॅट कंपनीच्या मते, वाईनच्या प्रत्येक बाटलीसाठी तीन किलो द्राक्षे वापरली जातात.

रेड वाईनमध्ये आढळतात अनेक पोषक घटक

कार्बोहायड्रेट, खनिजे प्रामुख्याने रेड वाईनमध्ये आढळतात. वाइनमध्ये असे पदार्थ असतात ज्यांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर आणि काही जुनाट आजारांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. आम्ही वर माहिती दिल्याप्रमाणे रेड वाईन मुख्यत्वे द्राक्षांपासून बनवली जाते आणि द्राक्षे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात.