हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना लॉक डाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचं सांगत दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या दरात टप्प्याटप्प्याने प्रतिलिटर आठ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे साधारण महिनाभरापूर्वी वाहतुकीसह मिळणारा 31 ते 32 रुपये दर पंचवीस रुपये केला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात केवळ 22 रुपये पडत आहेत. लॉक डाऊनची संधी साधत व्यापाऱ्यांनी आधीच शेतमालाचे दर पाडले असताना आता मुख्य जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायातही शेतकर्यांना फटका बसतोय.
लोकडाऊन चे कारण पुढे करत असलेला दर कमी केल्याचा दूध संघांकडून कारण सांगितले जात आहे. दुधाचे दर कमी झाले असताना त्या उलट पशुखाद्याच्या दरात मात्र वाढ झाल्याने दुधाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहेत. गेल्या वर्षी संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा दूध उत्पादकांचे तोट्याचे दिवस आले आहेत. दुधाचे दर कमी केल्याने सध्या राज्यातील दूध उत्पादकांना दररोज सुमारे 10 ते 11 कोटींचा तोटा सोसावा लागत आहे.
राज्यात गायीचे एक कोटी 40 लाख लिटर दूध संकलित होते. त्यातील 60 ते 65 लाख लिटर दूध थेट ग्राहकांना पिशव्यांमधून विकले जाते तर साधारण वीस लाख लिटर दुधाचे उपपदार्थ केले जातात. उर्वरित दुधाची भुकटी होते. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचं तसेच भुकटीचे दरही कमी झाल्याने दुधाच्या दरात कमालीची घट झाली होती. काही महिने तोटा सहन केल्यानंतर दुधाच्या दरात वाढ झाली गेल्या दीड महिन्यापूर्वी साधारण 3.57 फॅट 8.5 एसएनएफ असलेल्या दूध गाईच्या दुधाला प्रति लिटर 31 ते 32 रुपयांपर्यंत दर मिळत होता.
मात्र लॉक डाऊनची चर्चा सुरू झाली की लगेच मागणी घटल्याचे सांगत प्रतिलिटर तीन ते चार रुपयांनी कपात केली. त्यात वाढ करत करत आता महिनाभर तब्बल प्रति लिटरमागे सात ते आठ रुपयांनी कपात केला तर दिसत आहे. त्याचे पत्र काही खाजगी संघाने काढले आहे. सध्या साधारण 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला वाहतुकीत 25 रुपयांचा दर देत असल्याचे जाहीर केला आहे. शेतकऱ्याच्या हातात केवळ 22 रुपये लिटरने पैसे पडत आहेत. त्यातही सदर दुधात एसएनएफच्या 34.5 टक्के प्रोटीन बंधनकारक आहे.