दिलासादायक! घाऊक बाजारात कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Kanda
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | गत वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी घाऊक बाजारात विक्रीसाठी आलेल्या कांद्यांना चांगली किंमत मिळत आहे. चांगले दर मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावले असल्याचे सध्या थोडे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये कांद्याची लागवड चांगली झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक वाढली. आवक खूप वाढल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले होते. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण, गतवर्षासोबत तुलना केल्यास मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकरीही समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

करोणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे रेस्टॉरंट, खानावळी, उपहारगृह तसेच इतर कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे कांद्याला दरवर्षीप्रमाणे मागणी यावर्षी नाही. किरकोळ बाजारामध्ये कांद्याला एका किलोमागे वीस ते पंचवीस रुपये किंमत मिळत आहे. करोणाचे संसर्ग वाढले त्यावेळी बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये कांद्याची विक्री केली होती.

एप्रिल – मे या महिन्यांमध्ये बाहेरील राज्यातून कांद्याची मागणी कमी होत असते. त्यामुळे, बाहेरील राज्य कमी प्रमाणात कांदा खरेदी करत असल्यामुळे कांद्याचे भाव कमी होतात. सध्या बाजार समित्यांचे कामकाज सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सध्या घाऊक बाजारामध्ये कांद्याची प्रतवारीनुसार 11 ते 13 रुपये किलो या भावाने कांद्याची विक्री केली जात आहे. जे गेल्यावर्षीपेक्षा चांगले भाव आहेत. यामुळे शेतकरी थोडा तरी सुखावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/KzJiHgVregE3FOlwpDTyW6