Heat Waves Effect on Banana Orchards: वाढत्या तापमानामुळे केळीची बाग धोक्यात! वीज आणि पाणी टंचाईमुळे संकटात वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अति उष्णतेमुळे केळीच्या (Heat Waves Effect on Banana Orchards) कांदे बागेला मोठा फटका बसला असून, केळीचा पट्टा (Banana Belt) धोक्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून अती तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना, केळीला देखील मोठा फटका बसत आहे. अति उष्णतेमुळे केळीच्या कांदे बागेला मोठा फटका बसला असून, केळीचे पाने पिवळे (Yellowing Of Leaves) पडत आहेत. त्यातच ऐन उन्हाळ्यात केळीला पाण्याची गरज (Banana Water Requirement) असताना अनेक भागामधील बोअरवेल आटल्यामुळे तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या काठावरील केळीचा पट्टा धोक्यात आला आहे (Heat Waves Effect on Banana Orchards).

जळगाव जिल्ह्यात रावेरसह चोपड़ा व जळगाव तालुक्यातील तापी व गिरणा नदी काठावरील अनेक भागांमध्ये केळीची मोठ्या प्रमाणात लागवड (Banana Farming) होते. यामध्ये जळगाव तालुक्यात गिरणा काठावर आव्हाणे ते पळसोद, तर तापी काठावरील खापरखेडा ते भोकरपर्यंतच्या भागात केळीची लागवड केली जाते. मात्र, अती उष्णता, पाणी टंचाई, वि‍जेची समस्या व वाळू माफियांनी नदी पात्रातून केलेल्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी यामुळे भविष्यात जळगाव तालुक्यात प्रसिध्द असलेला केळीचा (Heat Waves Effect on Banana Orchards) हा झोन धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात 42 अंशापेक्षा अधिक तापमानाचा पारा अनेक दिवस कायम राहिला यामुळे केळीच्या बागांना सनबर्नचा (Banana Sunburn) धोका निर्माण झाला आहे.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत (Fruit Crop Insurance Scheme) एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस 42 अंशांपेक्षा अधिक तापमान राहिले, तर केळी उत्पादक शेतकर्‍यांना अती उष्णतेच्या (Heat Waves Effect on Banana Orchards) निकषाखाली हेक्टरी 35 हजार रूपयांची नुकसान भरपाई मिळते. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील 86 पैकी सुमारे 50 महसूल मंडळांमध्ये 42 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या (Famer Crop Insurance) अती उष्णतेच्या निकषात पात्र होण्याची शक्यता आहे.

अपूर्ण वीज, अपूर्ण पाण्याची समस्या (Heat Waves Effect on Banana Orchards)

केळी पि‍काला नेहमी 3 पाण्याची आवश्यकता असते. मात्र, शेतकर्‍यांना केवळ आठ तास वीजपुरवठा (Power Supply) केला जात आहे. त्यातदेखील अनियमितता असते. यामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होत आहेत. केळी उत्पादक शेतकयांना दिवस भरात 22 तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी संघटनाकडून केली जात आहे.

प्रचंड उष्णतेच्या काळात केळीला दिवसाला 20 ते 22 लीटर पाण्याची गरज असते. मात्र, अनेक शेतकर्‍यांच्या ऐन उन्हाळ्यात बोअरवेल आटल्या आहेत. अनेकांच्या बोअरवेलमधून कमी दाबाने पाणी येत असल्याने एका खोडाला 4 ते 6 लीटरच पाणी दिले जात असल्याची माहिती कठोरा येथील केळी उत्पादक शेतकरी यांनी दिली

नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये लागवड असलेल्या केळीला फटका

अती उष्णतेचा सर्वाधिक फटका नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या बागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अती उष्णतेमुळे पाने पिवळी पडत आहेत. त्यातच वाऱ्याचाही वेग 15 ते 20 किमी इतका आहे. यामुळे पाने फाटली आहेत. या प्रकारामुळे केळीची वाढ खुंटली आहे. केळीच्या बागांसाठी 90 ते 42 दरम्यान तापमान पूरक असते. मात्र, महिनाभरापासून तापमान 42 पेक्षा जास्त असून, गेल्या चार दिवसात तापमानाने 43 अंशाचा पल्ला गाठला असल्याने केळीला फटका बसत आहे (Heat Waves Effect on Banana Orchards).