हॅलो कृषी ऑनलाईन : सरकारच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे ‘पंतप्रधान जन-धन योजना’ . या योजनेअंतर्गत भारतातील लोकांना जन-धन खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्हाला वित्तीय लाभ देखील मिळतात.
खातेदारांना १. ३० लाखांपर्यंत लाभ
या योजनेअंतर्गत ज्यांनी खातं उघडलं आहे त्यांना एक १. ३० लाखांपर्यंत लाभ मिळतो. त्या मध्ये अपघाती विमा देखील मिळतो. खातेदाराला एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि ३०,००० रुपयांचा जनरल विमा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर खातेदाराचा अपघात झाला तर तीस हजार रुपये दिले जातात. या दुर्घटनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात. म्हणजे एकूण १.३० लाख रुपयांचा लाभ योजनेअंतर्गत दिला जातो.
यायोजनेत उघडली जाणारी खाती आणि सामान्य खाती यासाठीची प्रक्रिया फारशी वेगळी नाही. मात्र, जन-धनच्या खात्यांना काही प्रमाणात जादा सवलती आहेत. त्यांपैकी पहिली सवलत अशी की या सर्व खातेदारांना एक लाख रुपयांच्या िवम्याचे कवच आहे. अपघात झाल्यास संबंधितांना विमा कंपनीतर्फे ही रक्कम दिली जाणार आहे. दुसरी सवलत अशी, की हे खाते उघडताना कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागणार नाही.जन-धनयोजनेची खाती केवळ राष्ट्रीयीकृत बँकेतच उघडायची आहेत. एखाद्या व्यक्तीचे आधीच खाते असेल तर संबंधिताला दुसरे उघडण्याची गरज नाही. असलेले खाते जन-धनशी जोडण्यासाठीचा साधा अर्ज दिल्यानंतरही ते जोडले जाऊ शकते. मात्र, त्या खात्याला जन-धनच्या अटी लागू होतील, असे बँकांचे म्हणणे आहे.
जन धन खात्याचे फायदे
खात्यात कमीतकमी शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत सेव्हिंग अकाउंट इतकेच व्याज मिळेलमोबाइल बँकिंगची मोफत सुविधा मिळते. या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर मिळतो. तसेच 10 हजार रुपयांपर्यंक ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. या योजने अंतर्गत रुपे कार्ड सुविधेचा लाभ घेता येतो.
असे उघडा खाते
-प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते.
-तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा.
त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या.
-अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल.
-तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता.
-भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group