यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पावसाची नोंद; विभागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी : उन्हाळ्यातून पावसाळ्याचा विशेष आनंद देणाऱ्या आणि हक्काच्या अश्या मोसमी पावसाची राज्य वाट पाहत आहे. राज्याच्या बहुतांश भागांत यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा अनेक पटीने पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पूर्वमोसमी पाऊस कोकण विभागात नोंदविला गेला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा त्यात मोठा वाटा आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि पालघर जिल्ह्य़ात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्वमोसमी पावसामुळे राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे राज्यापुढील एक मोठी चिंता कमी झाली आहे.

मार्चच्या पूर्वी पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस होय. तर, पूर्वमोसमी पाऊस हा मार्च ते मे या महिन्यात पडतो. राज्यात मोठय़ा प्रमाणावर दोन्ही प्रकारांतील पावसाने हजेरी लावली. यामध्ये पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अधिक आहे. एकटय़ा मे महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प, राज्यावर निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळ आदी यामुळे यंदा पूर्वमोसमी पाऊस मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली असून राज्याच्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठी उपलब्ध झाला आहे.

आजच्या पाणीसाठ्याची टक्केवारी पाहिल्यास, विभागानुसार धरणांतील उपयुक्त पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे, पुणे विभागामध्ये यावर्षीचा सठा हा २८.५ टक्के, नाशिक विभागामध्ये ३९.५८ टक्के, नागपूर विभागामध्ये ४२.८२ टक्के, कोकण विभागामध्ये ४८.६७ टक्के, औरंगाबाद विभागामध्ये ३५.९८ टक्के, अमरावती विभागामध्ये ४४.८५ टक्के असा पाणीसाठा जमा झाला आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा