हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालकांनो आता तुम्ही तुमच्या जनावरांची गर्भधारणा (Animal Pregnancy Kit) घरीच तपासू शकता! हो तुम्ही जे वाचलेत ते अगदी खरं आहे. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले “प्रेगा-डी” (Prega D Kit) नावाचे हे किट जनावरांच्या लघवीच्या दोन थेंबांमधून गर्भधारणा (Animal Pregnancy Kit) निश्चित करते.
नियामतपूर येथील कृषी विज्ञान केंद्र, पशु संवर्धन विभागाचे (Department Of Animal Husbandry) तज्ज्ञ डॉ. शिवकुमार यादव यांनी या किटबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “हे किट वापरणे सोपे आहे आणि परिणाम त्वरित दिसून येतो. यामुळे पशु पालकांना वेळीच योग्य निर्णय घेता येतील आणि त्यांच्या जनावरांची चांगली काळजी (Animal Care) घेता येईल.”
गर्भधारणा तपासणी किटचा (Animal Pregnancy Kit) वापर कसा करायचा?
- प्रेगा-डी किट जनावरांची औषधे विकणार्या मेडिकल स्टोअरमधून (Animal Pharmacy) किंवा डॉक्टरांकडून (Veterinary Doctor) 10 रूपयांना खरेदी करा.
- गाय किंवा म्हशीच्या मुत्राचे (Cattle Urine Pregnancy Test) दोन थेंब किट मधील चाचणी ट्यूबमध्ये टाका.
- काही सेकंदात, डिस्प्लेवर रंग बदल होईल.
- गडद लाल किंवा जांभळा रंग: प्राणी गरोदर आहे.
- पिवळा किंवा हलका रंग: प्राणी गर्भवती नाही.
गर्भधारणा तपासणी किटचे फायदे (Animal Pregnancy Kit Benefits)
- वेळेची बचत होऊन आणि खर्च कमी होईल
- अचूक परिणाम मिळते
- पशुपालकांना जनावरे गर्भार आहेत हे कळल्यावर त्यांची चांगली काळजी घेता येईल
- गर्भाचा चांगला विकास होईल
- निरोगी जनावरे आणि चांगले दूध उत्पादन मिळेल
शेतकर्यांना आवाहन
डॉ. यादव यांनी शेतकर्यांना हे किट वापरून आपल्या जनावरांची गर्भावस्था त्वरित तपासण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “यामुळे तुम्हाला तुमच्या जनावरांची चांगली काळजी घेता येईल आणि त्यांच्यापासून अधिक उत्पादन मिळेल.”