हॅलो कृषी ऑनलाईन: नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा (PM Kisan Samman Nidhi) तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकर्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले ते म्हणजे शेतकरी सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 17 हप्ता मंजूर केला.
या योजनेंतर्गत मंगळवार 18 जून ला शेतकर्यांच्या (Farmers Account) खात्यात पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आलेले आहेत. पण काही शेतकर्यांना अद्याप ही रक्कम (PM Kisan Samman Nidhi) मिळालेली नाही.
हा सन्मान निधी मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे गरजेचे होते. त्यानुसार काही त्रुटी राहिल्या असतील तर ही रक्कम खात्यात जमा झाली नसेल. परंतु काही शेतकर्यांनी सर्व अटींची पूर्तता करून सुद्धा त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले नसतील तर असे शेतकरी थेट पीएम शेतकरी सन्मान निधीचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार (PM Kisan Samman Nidhi Complaint) करू शकतात.
राज्य तसेच देशातील अनेक शेतकर्यांच्या बँक खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेले नाहीत. अशा शेतकर्यांना थेट तक्रार करता येते.
या योजनेचे काम पाहणाऱ्या [email protected]. आणि [email protected] या अधिकृत मेल आयडींवर (PM Kisan Samman Nidhi Complaint Email) शेतकरी यासंबंधी तक्रार करू शकतात.
तसेच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे एक हेल्पलाईन नंबरही (PM Kisan Samman Nidhi Complaint Number) जारी केलेला आहे. शेतकरी 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवरही थेट तक्रार करू शकतात.
पीएम शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत एक टोल फ्री नंबरही जारी करण्यात आला आहे. 1800-115-526 टोल फ्री नंबरवरही शेतकरी आपली तक्रार दाखल करू शकतात.
पेरणीच्या काळात हा निधी बँक खात्यावर आल्यामुळे शेतकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रत्येक लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये याप्रमाणे केंद्र सरकारने मंगळवारी 9.6 कोटी शेतकर्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान, काही लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेले नाहीत. त्यांनी वर दिलेल्या ई-मेल आयडी वर किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.