हॅलो कृषी ऑनलाईन: आंब्याला किमान आधारभूत किंमत (MSP For Mango) देण्याचा मोठा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh Government) घेतला आहे. आंब्याच्या पिकासाठी हमीभाव जाहीर केला आहे. शेतकर्यांना प्रति टन आंब्यासाठी 30,000 रुपये भाव (MSP For Mango) मिळणार आहेत.
आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि तिरुपती (Tirupati) जिल्ह्यांतील आंबा उत्पादक त्यांच्या उत्पादनाला वाजवी दर मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. अखेर या ठिकाणी तोतापुरी जातीच्या (Totapuri Mango) आंब्यासाठी प्रति टन 30,000 रुपये किमान आधारभूत किंमत (MSP For Mango) निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे शेतकर्यांना मोठा फायदा (Benefit To Farmers) होणार असल्याचे बोलले जात आहे.
विविध संकटामुळे पीक उत्पादनात लक्षणीय घट
तोतापुरी जातीसाठी काही व्यापारी केवळ 20 हजार रुपये प्रतिटन दर देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ते विविध खर्चासाठी अतिरिक्त 12 टक्के कपात करत आहेत. या व्यापार्यांनी मोठमोठी संकलन केंद्रे उभारून शेतकर्यांची फसवणूक केल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. अशा किंमतीतील फेरफारामुळे अनेक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. हे शेतकरी प्रामुख्याने तोतापुरी जातीची लागवड करतात. त्यांना योग्य परताव्याची अपेक्षा होती. परंतु पीक उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्याच वेळी आंबा शेतकर्यांची ही अडचण लक्षात घेऊन चित्तूर आणि तिरूपतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फलोत्पादन आणि पणन अधिकार्यांची बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी तोतापुरी आंब्याची किमान किंमत (MSP For Mango) 30,000 रुपये प्रति टन निश्चित केली आहे,.
घसरणाऱ्या किमतीचा शेतकर्यांना बसत होता फटका
मजूर, खते आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेता प्रति टन 30,000 रुपये किंमत (MSP For Mango) चांगली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परंतु किंमती घसरल्यानंतर आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागत होता असे शेतकरी म्हणाले.