Satbara Utara Download: सातबारा उताऱ्यांचे डाऊनलोड 19 ते 22 जुलै दरम्यान राहणार बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सातबारा उतारा (Satbara Utara Download) याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. भूमी अभिलेख विभागाचे (Land Records Department) ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे 19 ते 22 जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसांच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाऊनलोड (Satbara Utara Download) करता येणार नाहीत, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

ई-फेरफार (e-Ferfar), ई-हक्क, ई-चावडी (e– Chawadi) तसेच ई-महाभूमी (e -Mahabhumi) या पोर्टलवरून सातबारा उतारे, आठ अ, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाऊनलोड (Satbara Utara Download) करता येतात. या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे. उतारे डाऊनलोड करताना अडचणी येतात.

हे सॉफ्टवेअर 2016 पासून वापरात आहे. त्यात आधुनिकता आणणे गरजेचे होते. त्यामुळेच भूमी अभिलेखने हे सॉफ्टवेअर (Land Records Software) अद्ययावत (Updated) करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विभागाकडून चालविण्यात येणारी सर्व पोर्टल 19 जुलैच्या सायंकाळी 6 वाजेपासून 22 जुलैच्या रात्री 12 पर्यंत बंद राहतील.

कमी वेळात उतारे होणार डाऊनलोड (Satbara Utara Download)
नवीन सॉफ्टवेअर हे 2024 मध्येच तयार करण्यात आले आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली असून, त्याचा वापर सुरू झाल्यानंतर उतारे कमी वेळेत डाऊनलोड होतील, अशी माहितीही नरके यांनी यावेळी दिली. सध्या ई-पीक पाहणी, खरीप पीक विमा योजना तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांनी 19 जुलैपूर्वीच काढावीत, जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही, असेही नरके यांनी सांगितले.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.