Biogas Generation: शिळ्या अन्नापासून ‘येथे’ करतात ‘बायोगॅस निर्मिती’; वाया जाणाऱ्या अन्नासाठी उत्तम पर्याय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात (Biogas Generation) जेवढे जास्त प्रमाणात अन्नधान्य उत्पादन केले जाते, तसेच हे अन्नधान्य वाया (Food Wastage) जाण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. विशेषतः शिजवलेले अन्न. रोजचे अन्न असो की मोठमोठे लग्न समारंभ किंवा कार्यक्रमात भरपूर अन्न उरते किंवा नासते. असे अन्न मग कोणाला देण्यात येते किंवा नासले असेल तर फेकण्यात जाते. परंतु जर आम्ही तुम्हाला सांगीतले की या शिळ्या अन्नापासून (Stale Food) बायोगॅस निर्मिती (Biogas Generation) करता येते. आश्चर्य वाटले ना?  

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) गोंडपिपरी येथील कन्यकामाता मंदिरात (Kanyaka Mata Mandir Gondpipari) अनेकांकडून भोजनदान (Food Donation) दिले जाते. मात्र तयार केलेले हे अन्न खुपदा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहते. यावर उपाय म्हणून येथील मंदिर समितीने मंदिर सभागृहाच्या बाजूलाच बायोगॅस प्रकल्प (Biogas Project) तयार केला आहे. आता याच बायोगॅसच्या (Biogas Generation) माध्यमातून भोजन तयार केले जाते. शिवाय सभागृहात राहणार्‍या इतरही कर्मचार्‍यांना याचा लाभ होऊ लागला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील कन्यकामाता मंदिर सभागृहात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन होत असते. मंदिर सभागृह परिसरात मोकळी जागा असल्यामुळे जनावरांचा वावर दिसून येत असतो. दरम्यान, कार्यक्रमातील अनावश्यक आणि नाशवंत अन्न बाहेर फेकल्यांनतर मोकाट गुरांनी ते खाल्ले तर त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणून मंदिर प्रशासनाने शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती (Biogas Generation) करण्यास सुरवात केली आहे. या सभागृहात अनेक कार्यक्रम पार पडतात; मात्र हे कार्यक्रम संपन्न झाल्यावर जेवणावळीनंतर शिल्लक अन्नाची विल्हेवाट आता बायोगॅसच्या माध्यमातून लावली जात आहे. 

शिळ्या अन्नापासून जनावरांना विषबाधा होऊ नये. सभागृह परिसरात दुर्गंधी पसरू नये, नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाच वर्षापासून बायोगॅसचा वापर (Biogas Generation) सुरू आहे. सभागृहात काम करणारे कर्मचारी व पुजारी बायोगॅसचा वापर करून स्वयंपाक बनवतात. 

आपल्या देशात लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमात जेवणाच्या पंगतीत भरपूर अन्न उरते . त्यामुळे या पद्धतीचा वापर केल्यास अन्न वाया तर जाणार नाहीच शिवाय परिसर सुद्धा स्वच्छ राहील. त्यामुळे प्रत्येक गावात आणि शहरात या पर्यायाचा अवलंब करण्याचा विचार करण्यास हरकत नाही.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.