Lumpy Skin Disease: सावधान! राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय; वेळीच करा ‘हे’ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात परत एकदा लंपी रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. जनावरांना होणारा हा संसर्गजन्य (Diseases In Animals)  रोग कधीकधी त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतो. मागील दोन वर्षापासून या रोगाने देशात थैमान घातलेला होता. आता परत या रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव राज्यात आढळून येत आहे.

लंपी रोगामुळे (Lumpy Disease) जनावरांच्या त्वचेवर आणि शरीराच्या इतर भागांवर गाठी आणि व्रण येऊन आतून पोखरणाऱ्या या रोगामुळे पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांनी (Dairy Farmers) जनावरांना वेळीच प्रथमोपचार आणि लसीकरण (Animal Vaccination) करून घेण्याचा सल्ला पशुवैद्यकीय तज्ज देत आहेत.

या रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रसार माशा, डास, गोचीड, कीटक, चिलटे यांच्या मार्फत होतो. निरोगी जनावर बाधित जनावराच्या संपर्कात निरोगी जनावर आल्यावर सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. जनावरांचे बाधित अश्रु, वीर्य, चारा यामुळे सुद्धा रोगाची वाढ झपाट्याने होते. बाधित गाभण जनावराच्या जन्माला येणार्‍या वासरास तसेच दूध पिणाऱ्या वासरास बाधित गायीच्या दुधातून किंवा सडावरील जखमेतील स्रावातून बाधा होऊ शकते.

लंपी रोगाची जनावरात दिसणारी लक्षणे (Lumpy Disease Symptoms)

या आजारामुळे जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. चारा खाणे आणि पिणे कमी होते,

ताप येतो, दुधाचे प्रमाण कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.

अशी घ्या जनावरांची काळजी (Lumpy Skin Disease Treatment)

  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण (Lumpy Disease Vaccine) पशुवैद्यकाकडून लसीकरण करून घ्यावे.
  • जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवा, जनावरांना गोचीड यापासून मुक्त ठेवावे.
  • बाजारातून विकत आणलेले जनावरे इतर गुरांपेक्षा वेगळी ठेवावीत. त्यांना जवळपास महिनाभर लांब अंतरावर बांधावे.
  • लम्पीची बाधा झाल्यास तात्काळ पशु तज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत.
  • चिलटे, माश्या, गोचीड आणि डासांद्वारे लम्पी रोगाचा फैलाव होतो. गोठ्यातील भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा.
  • जनावरांच्या शरीरावर झालेल्या जखमा 2 टक्के पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन त्यावर बोरोग्लिसरीन लावावे (Lumpy Skin Disease).