Rabi Sowing Area: ‘या’ पिकांच्या कमी लागवडीमुळे देशातील रब्बी पिकाखालील क्षेत्र 7 टक्यांनी कमी झाले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील रब्बी पिकाखालील क्षेत्रात (Rabi Sowing Area) घट झाल्याचे अहवाल समोर आले आहे. सर्व रब्बी पिकांखालील एकूण क्षेत्र 8 नोव्हेंबरपर्यंत 146.06 लाख हेक्टर  होते, जे मागील वर्षी 157.73 लाख हेक्टर होते, म्हणजे एकूण 7.4 टक्क्यांनी घट झालेली आहे. राज्यांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार गहू, चना (हरभरा), मोहरी आणि ज्वारीचे (Chana, Wheat, Mustard, Jowar Crop) एकरी उत्पादन घटले (Production Decreases) आहे.

गहू या रब्बी हंगामातील प्रमुख अन्नधान्य असलेल्या पिकाची पेरणी (Rabi Sowing Area) 8 नोव्हेंबरपर्यंत 15.5 टक्क्यांनी कमी म्हणजे 41.3 लाख हेक्टर झालेली आहे,  जे एका वर्षापूर्वी 48.87 लाख हेक्टर होती. त्याचप्रमाणे, चना 27.42 लाख हेक्टर वरून 24.57 लाख हेक्टरवर म्हणजे 10.4% कमी, आणि मोहरी 50.73 लाख हेक्टरवरून 1.6% घसरून 49.90 लाख हेक्टरवर आहे. ज्वारीचे क्षेत्र, मुख्यत्वे खरीप आणि काही भागांमध्ये रबी हंगामात पिकवले जाते, ते 8.93 लाख हेक्टर वरून 25.1 टक्क्यांनी घसरून 6.69 लाख हेक्टर वर आले आहे.

दुसरीकडे, हिवाळी हंगामातील (Rabi Season Crops) भाताचे क्षेत्र जवळपास बरोबरीचे आहे कारण एका वर्षापूर्वी 6.99 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी 7.04 लाख हेक्टर क्षेत्र लागवड  झालेली आहे. रब्बी मक्याचे एकरी क्षेत्र 1.8 लाख हेक्टर वरून 2.71 लाख हेक्टर म्हणजेच  50.3 टक्क्यांनी वाढले आहे. मसूरची पेरणी देखील 11.2 टक्क्यांनी वाढून 4.28 लाख हेक्टर झालेली आहे. मागील वर्षी यावेळी 3.85 लाख हेक्टर नोंदविली गेली होती.  बार्लीची सुमारे 69,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे वर्षापूर्वी 27,000 हेक्टर होती (Rabi Sowing Area).

सरकारने चालू रब्बी हंगामात गव्हासाठी 115 दशलक्ष टन, तांदूळ 14.55 दशलक्ष टन, मका 12 दशलक्ष टन, चना 13.65 दशलक्ष टन, मसूर 1.65 दशलक्ष टन, मोहरीसाठी 13.8 दशलक्ष टन आणि बार्लीसाठी 2.25 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. उत्पादन निश्चित करण्यासाठी पिकांचे एकरी क्षेत्र (Rabi Sowing Area) हे महत्त्वाचे घटक आहे कारण शेतकरी सामान्यतः अशी पिके निवडतात ज्यांना बाजारात जास्त भाव मिळतो.

2024-25 पीक वर्षासाठी (जुलै-जून) निर्धारित केलेल्या एकूण 341.55 दशलक्ष टन अन्नधान्याच्या उद्दिष्टात (Food Grain Target), रब्बी हंगामातील अन्नधान्यांचे योगदान 164.55 दशलक्ष टन किंवा 48 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

कृषी तज्ज्ञांनुसार उत्तर-पश्चिम मैदानी प्रदेशात गव्हाच्या पेरणीची योग्य वेळ 20 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि त्यापलीकडे पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट होऊ शकते. गव्हाचे चांगले पीक येण्यासाठी आता खतांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने रब्बी पेरणीच्या (Rabi Sowing Area) वेळी अतिक्रियाशील राहण्याची सूचनाही केल्या आहेत.

उत्तर प्रदेशात, काही जिल्ह्यांतील शेतकरी गहू की उसासाठी जायचे हे ठरवण्यासाठी वाट पाहत आहेत, राज्य सरकारकडून उसाच्या राज्य सल्ला मूल्य (State Advised Price) घोषणेला उशीर झाल्याचे कारण सांगितले, तर सध्याचे गव्हाचे दर अत्यंत किफायतशीर आहेत. .

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.