हॅलो कृषी ऑनलाईन । भारतात जवळपास ७५% लोक शेती करतात. म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हंटले जाते. भारतात खूप कमी शेतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात . त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रश्न हा असतोच कधी जास्त पडतो तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतो . त्यामुळे कधी पिकातून पैसे मिळतात तर कधी नाही अशी अवस्था भारतीय शेतीची आहे. पण जे लोक इतर कामामुळे शेती करू शकत नाही पण आवड आहे अशी लोक सुद्धा अनेक क्लुप्त्या वापरून छोटी मोठी शेती करण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपल्या रिकाम्या जागेत बाल्कनीत किंवा टेरेस चा वापर ते झाडे लावण्यासाठी करतात. मातीशिवाय उगवण्याच्या येणाऱ्या ऑरगॅनिक झाडांची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहतो. पण या माणसाने एक नाही दोन नाही तब्बल ४०० आंब्याची झाडे आपल्या बाल्कनीत लावली आहेत. जोसेफ फ्रान्सिस Joseph Francis असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते केरळ मध्ये राहतात.
जोसेफ हे ६२ वर्षीय आहेत ते एका ठिकाणी टेक्निकल चे काम करतात. त्यांच्या आजोबांचा शेती हा व्यवसाय होता. त्यांतर कामामुळे त्यांना त्या व्यवसायात पडता आले नाही. आपल्या शेतात त्यांनी गुलाब मशरूम यांची झाडे लावली आहेत. त्याबरोबर आंब्याची पण झाडे लावली आहेत. जोसेफ यांनी बेटर इंडियाशी बोलताना म्हंटले आहे कि, माझ्या घरात सर्वानाच झाडे लावण्याचे आणि जोपासण्याचे वेड आहे. माझ्या मामानी अनेक देशातून गुलाबाची झाडे आणली होती. ती सर्व झाडे आमच्या बाल्कनीत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची पण झाडे आहेत. काही फळझाडे वर्षातून दोनदा फळे देतात. जोसेफ यांनी आंब्याची एक नवी प्रजात तयार केली आहे . त्याला आपल्या पत्नीचे नाव दिले आहे. Joseph Francis