हॅलो कृषी ऑनलाईन: अलिबागच्या (Alibag White Onion) पांढऱ्या कांद्याला (White Onion Price) चव आणि औषधी गुणधर्म(Medicinal Properties Of White Onion) यामुळे मोठी मागणी असते. मात्र, यंदा या कांद्याची माळ 50 रूपयांपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दिडशे ते अडीचशे रुपये दराने (White Onion Price) विकण्यात येत आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक आवर्जून हा पांढरा कांदा खरेदी करतात.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावांत पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबागमधील 250 हेक्टरवर पांढरा कांदा लागवड करण्यात येते.
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी या कांद्याची एक माळ 300 रुपये दराने (White Onion Price) विकण्यात येत होती. यंदा दिडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. यंदा या पिकाची उलाढाल ही सुमारे 3 कोटींची आहे. दरवर्षी कांदा लागवड क्षेत्रामध्ये (Onion Cultivation Area) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशी माहितीही शेतकर्यांनी दिली.
शेतकर्यांचे व्यापार्यांकडे डोळे
अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारी वर्ग हा काढणी आधी शेतकर्याकडे येत असतो. गतवर्षी माळेला 1400 रुपये दर (White Onion Price) व्यापारी यांच्याकडून देण्यात आला होता. यावेळी आठशे ते अकराशे दर दिला जात आहे. मात्र, उत्पादन अधिक वाढले असल्याने व्यापारी वर्गाने सध्या पांढरा कांदा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. भाव कमी होईल या आशेने व्यापारी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचे व्यापारी येण्याकडे डोळे लागले.
शेतकरी करत आहेत थेट पर्यटक ग्राहकांना विक्री
आपला पांढरा कांदा विकण्यासाठी शेतकर्यांनी अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजवली आहेत. त्यामुळे अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या कांदा विक्रीस दिसू लागला आहे.
छोट्या कांद्याची माळ दिडशे, तर मोठी माळ अडीचशे रुपये दराने (White Onion Price) मिळत आहे.
अलिबाग हे पर्यटनस्थळ असल्याने येणारे पर्यटक आवर्जून माघारी निघताना पांढरा कांदा खरेदी (Tourist Buying White Onion) करीत आहेत. व्यापारी आले नसले तरी शेतकर्यांचा माल हा विकला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना पांढरा कांद्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.