हॅलो कृषी ऑनलाईन: देशाच्या डेअरी (White Revolution 2.0) सहकार क्षेत्राचा कायापालट करण्याचा एक उपक्रम असलेल्या ‘श्वेत क्रांती 2.0’ चे केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यामार्फत काल अनावरण झाले आहे. भारताच्या दुग्ध सहकारी क्षेत्राचा (Dairy Sector) कायापालट करण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम समजला जात आहे. महिला शेतकऱ्यांना (Women Farmers) सक्षम करणे, दूध उत्पादन वाढवणे, डेअरी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि निर्यातीला चालना देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या संगणकीकरणासह दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो-एटीएमचा समावेश आहे. महिला शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुद्धा हा एक व्यापक उपक्रम (White Revolution 2.0) आहे.
हा कार्यक्रम चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो – महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, स्थानिक दूध उत्पादन वाढवणे, दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्धव्यवसाय निर्यातीला (Dairy Exports) चालना देणे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांत हाती घेण्यात आलेल्या तीन उपक्रमांपैकी हा एक उपक्रम (White Revolution 2.0) आहे.
एकट्या गुजरातमध्ये 60,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करून, सर्वाधिक महिला डेअरी क्षेत्रात गुंतलेल्या आहेत. हा नवा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणावर आणि कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकट करण्यावर भर देईल,” असे शाह यांनी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.
मंत्र्यांनी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपे किसान क्रेडिट कार्डचे देशव्यापी रोलआउट आणि दुग्ध सहकारी संस्थांमध्ये मायक्रो-एटीएम बसवण्याचा शुभारंभ केला. याव्यतिरिक्त, त्यांनी 67,930 प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) च्या संगणकीकरणासाठी मानक कार्यपद्धती जारी केली.
श्वेतक्रांती 2.0 (White Revolution 2.0) अंतर्गत, पुढील पाच वर्षांत दुग्ध सहकारी संस्थांकडून (Dairy Cooperative Societies) दूध खरेदी (Milk Procurement) 50 टक्क्यांनी वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या योजनेत (White Revolution 2.0) 1,00,000 नवीन आणि विद्यमान जिल्हा सहकारी संस्था, बहुउद्देशीय जिल्हा सहकारी संस्था आणि बहुउद्देशीय PACS ची स्थापना आणि बळकटीकरण यांचा समावेश आहे, ज्यांना आवश्यक पायाभूत सुविधांसह दूध मार्गांशी जोडले जाईल. सुरुवातीला, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) स्वतःच्या संसाधनांमधून या उपक्रमासाठी निधी प्रदान करेल.
शाह यांनी कार्यक्रमासाठी पूर्ण अर्थसंकल्पीय सहाय्याचे आश्वासन देताना ते म्हणाले “व्हाइट रिव्होल्यूशन 2.0 ला पुरेसा अर्थसंकल्पीय पाठिंबा मिळेल की नाही याबद्दल अनेकांना शंका आहे. मी यासाठी पूर्ण अर्थसंकल्पीय समर्थन देतो कारण ते सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र आहे.”
शाह यांनी ‘सहकारांमध्ये सहकार्य’ उपक्रमाचा देशव्यापी विस्तार करण्याची घोषणाही केली, जी गुजरातमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली.
हा कार्यक्रम (White Revolution 2.0) रुपे-किसान क्रेडिट कार्डद्वारे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमुक्त रोख क्रेडिट प्रदान करेल आणि डेअरी सहकारी संस्थांना मायक्रो-एटीएम वितरित करेल, बँकिंग सेवा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवेल.
सहकार क्षेत्रातील सुधारणांच्या गरजेवर भर देताना शहा म्हणाले, “गेल्या 70 वर्षांत देशात विविध क्षेत्रात सुधारणा झाल्या, पण सहकार क्षेत्रात वेळेवर सुधारणा झाल्या नाहीत. सहकार क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि आधुनिकीकरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापने मागचा उद्देश होता”
या उपक्रमांद्वारे (White Revolution 2.0), सरकारचे उद्दिष्ट सहकार क्षेत्राला बळकट आणि विस्तारित करण्याचे आहे, ज्यामुळे देशभरातील सुमारे 13 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल.