हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना कानातील टॅग (Animal Tagging) लावणे बंधनकारक केले आहे. 1 जून पासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) जनावरांना कानातील टॅग (Animal Ear Tagging) लावणे बंधनकारक केले आहे. 1 जून पासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय 18 लाख 876 जनावरांचे टॅगिंग (Animal Tagging) पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
आपत्ती काळात जनावर दगावल्यास अनुदान मिळवण्यासाठी टॅग आवश्यक
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाचा (National Digital Livestock Mission) भाग म्हणून भारतीय पशुधन प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली पशुधनासाठी (Livestock) सर्व प्रकारचे कान टॅगिंग रेकॉर्ड करते. त्यामुळे जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय आपत्ती काळात जनावर दगवल्यास अनुदान मिळवण्यासाठी हा टॅग आवश्यक असणार आहे. जनावरांचे टॅगिंग (Animal Tagging) नसल्यास शासकिय योजनांचा (Government Schemes) लाभ मिळणार नाही. त्यामुळे पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग (Ear Tagging) करुन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाकडून करण्यात आले आहे.
इअर टॅगिंग केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करुन घेण्यास मदत
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत NDLM-नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत (NDLM) भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुपालकांकडील सर्व पशुधनास इअर टॅगिंग (कानातील पिवळा बिल्ला) केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करुन घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पशुपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगींग (Animal Tagging) पूर्ण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाने केले आवाहन
जनावरांचे इअर टॅगींग केल्यामुळे सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सर्व पशुधनास कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दिली आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे कानात बिल्ले मारून घेण्यासाठी त्वरित आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाच्या आवाहनानंतर किती पशुपालक आपल्या जनावरांच्या कानाला टॅगींग (Animal Tagging) करुन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.