हॅलो कृषी । केळीची शेती महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि ज्ञान बऱ्याच लोकांना नसते. यासाठी, एक ऑनलाइन सर्टिफिकेट कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा चार सत्रांची असणार आहे. यामध्ये, केळीसाठी रायपनिंग, चेंबरची उभारणी, भाडेतत्त्वावर व्यवसायाच्या संधी, रायपनिंग फूड सेफ्टी यासोबतच केळी निर्यातीमधील तसेच, निर्यात कोठे आणि कशी करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करणारी ही कार्यशाळा आहे.
भारतातून तयार झालेली केळीसाठी अनेक देशांमधून मागण्या आहे. देशांमध्ये निर्यात करण्यासाठी लागणारे परवाने व इतर गोष्टींचे माहिती या कार्यशाळेमध्ये दिली जाणार आहे. यासोबतच, रोग आणि किडे वरील नियंत्रण, योजना, शासनाचे सहकार्य इत्यादी विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
हि कार्यशाळा एकूण चार सत्रांमध्ये आणि दोन दिवसामध्ये होणार आहे. कार्यशाळेला सुरुवात 16 मेपासून आणि कार्यक्रमाची सांगता ही 17 मे रोजी होणार आहे. चार सत्रासाठी प्रतिव्यक्ती एकूण पाच हजार रुपये ठेवले आहे. इच्छुकांनी, नावनोंदणीसाठी 988109757 आणि 7219611306 या क्रमांकावर फोन करून नाव नोंदवावे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7