Bhujal Samrudh Gram Spardha: भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23जिल्हास्तरीय निकाल जाहीर; तुमचे गाव आहे का बघा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा (Bhujal Samrudh Gram Spardha) 2022-23 चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे (Bhujal Samrudh Gram Spardha) सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी कळविले आहे.

लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे (Bhujal Samrudh Gram Spardha) आयोजन करण्यात आले.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना 26 नोव्हेंबर, 2020 पासून महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 43 तालुक्यामधील 1133 ग्रामपंचायतींमध्ये सुरु आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. त्याकरीता ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरुन काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी गावा-गावांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट “लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन” साध्य होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे (Bhujal Samrudh Gram Spardha) आयोजन करण्यात आले. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेमधील ठळक बाबी पुढीलप्रमाणे (Bhujal Samrudh Gram Spardha)
– 
सन 2023 मध्ये महाराष्ट्रातील योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या 12 जिल्ह्यातील 270 ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
– एकूण 550 गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली.
 स्पर्धेचे मूल्यांकन उपविभागस्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीनस्तरावर करण्यात आले.
उपविभागीय समिती: उपविभागीय अधिकारी (महसूल) अध्यक्ष व इतर सदस्य.
जिल्हास्तरीय समिती: जिल्हाधिकारी अध्यक्ष व इतर सदस्य.
राज्यस्तरीय समिती: प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अध्यक्ष व इतर सदस्य.

पुरस्काराचे स्वरुप (Bhujal Samrudh Gram Spardha)
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार हा 1 कोटी रुपयांचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराची रक्कम 50 लाख असून तृतीय पुरस्कार 30 लाख रुपयांचा आहे. तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 30 लाख व तृतीय क्रमांकास 20 लाखांचे पारितोषिक आहे. ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम अटल भूजल योजनेंतर्गत राज्यास प्राप्त होणाऱ्या प्रोत्साहन निधीमधून अदा केली जाणार आहे.

सन 2022-23 साठी घेण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल यादी पुढील प्रमाणे आहे. (Bhujal Samrudh Gram Spardha)

अ.क्र.जिल्हातालुका ग्रामपंचायत क्रमांक बक्षिसाची रक्कम
1पुणे बारामती काऱ्हाटीप्रथम 50 लाख
  पुरंदर सोनोरीद्वितीय 30 लाख
  पुरंदर चांबळीतृतीय 20 लाख
2सातारामाणकिरकसालप्रथम 50 लाख
  खटावनिढळद्वितीय 30 लाख
  खटावमांडवेतृतीय 20 लाख
3सांगलीकवठेमहांकाळनांगोळेप्रथम 50 लाख
  कवठेमहांकाळबोरगावद्वितीय 30 लाख
  तासगाववडगावतृतीय 20 लाख
4सोलापूरमाढाभेंडप्रथम 50 लाख
  माढालोंढेवाडीद्वितीय 30 लाख
  माढासोलंकरवाडीतृतीय 20 लाख
5नाशिकसिन्नरवडगाव पिंगळाप्रथम 50 लाख
  सिन्नरदातलीद्वितीय 30 लाख
  देवळाकनकापूरतृतीय 20 लाख
6जळगावरावेरसावखेडे बु.प्रथम 50 लाख
  पारोळाउंदिरखेडेद्वितीय 30 लाख
  रावेरखिरोदा प्र. यावलतृतीय 20 लाख
7जालनापरतूरआंबाप्रथम 50 लाख
  घनसावंगीबोररांजणीद्वितीय 30 लाख
  घनसावंगीहातडीतृतीय 20 लाख
8लातूरलातूरहरंगुळ बु.प्रथम 50 लाख
  निलंगाजाजनूरद्वितीय 30 लाख
  चाकूरवडवळ ना.तृतीय 20 लाख
9उस्मानाबादउस्मानाबादखेडप्रथम 50 लाख
  उस्मानाबादखामसवाडीद्वितीय 30 लाख
  उमरगाभगतवाडीतृतीय 20 लाख
10 अमरावतीवरुडजरुडप्रथम 50 लाख
  वरुडझटामझरीद्वितीय 30 लाख
  मोर्शीअंबाडातृतीय 20 लाख
11बुलढाणामोताळानिपाणाप्रथम 50 लाख
  मोताळाशेलगाव बाजारद्वितीय 30 लाख
  मोताळावरुडतृतीय 20 लाख
12नागपूरनरखेडखेडी गोवारगोंदीप्रथम 50 लाख
  काटोलखुर्सापारद्वितीय 30 लाख
  काटोलडोर्ली भांडवरकरतृतीय 20 लाख
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.