Buldhana News : मागच्या काही दिवसापासून शेतकरी मोठ्या संकटात आहे. मागच्या एक महिन्यापासून पाऊस पडत नाही त्याचबरोबर पिकाला योग्य भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवत आहेत. कोथिंबीर असेल कांदा, मूग, उडीद या पिकांवर शेतकऱ्यांनी अक्षरशः बाजार नसल्यामुळे ट्रॅक्टर फिरवला आहे. दरम्यान सध्या बुलढाण्यातील एका शेतकऱ्याने वांग्यावर ट्रॅक्टर फिरवल्याची माहिती समोर आली आहे. वांग्याला बाजार भाव मिळत नसल्याने या शेतकऱ्याने वांग्याच्या शेतावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
वांग्याला सध्या किती बाजारभाव मिळतोय?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वांग्याला सध्या किती बाजार भाव मिळतोय हे चेक करायचे असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपलेHello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर ते ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला बाजार भाव ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी वांग्याचे बाजार भाव पाहायला मिळतील. त्याचबरोबर तर शेतमालाचे देखील तुम्ही बाजारभाव या ठिकाणी पाहू शकता त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.
बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकरी दिलीप डुकरे यांनी त्यांच्या वांग्याच्या शेतात ट्रॅक्टर फिरवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बाजारात वांग्याला भाव मिळत नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. हा शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील पेठ येथील रहिवासी आहे. त्यांनी अर्धा एकर मध्ये वांगी लावली होती आणि याच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता मात्र झालेला खर्च देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्याने संतापून वांग्याच्या शेतात ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला.
वांग्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्याला मोठा खर्च आला सुरुवातीला बाजारभाव मिळाला मात्र आता वांग्याला बाजारात भाव मिळत नाही आणि मजुरांचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्याने वांग्यावर ट्रॅक्टर फिरवला असल्याचे स्वतः शेतकऱ्यांने माहिती दिली आहे.