Crab Farming: खेकडापालन व्यवसायाचे शास्त्रीय प्रशिक्षण घ्यायचे आहे का? इथे संपर्क करा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मासे, कोळंबी, मुळे, खेकडे पालन (Crab Farming) हे कोकण प्रदेशातील स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. कोकण प्रदेशाला (Konkan) लाभलेल्या विस्तृत किनार पट्टीमुळे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी मासे खेकडा संवर्धनाचे (Crab Farming) प्रकल्प ठिकठिकाणी कार्यान्वित आहेत.

यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थाजन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी आहे.

परंपरागत शेतीची कास धरली पण वातावरणीय बदल, भेसळयुक्त बियाणे आणि शेतीतील उत्पादनाबाबतची अनिश्चितता यामुळे नवीन काही उत्पन्नाचा पर्याय तरुण बेरोजगार, नवोद्योजक, मत्स्य व्यावसायिक शोधत आहेत.

यावर उपाय म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Dr. BSKKV Dapoli) यांनी परसबागेत, घराच्या पडवीत, बंद असलेल्या गोठ्यात, एवढेच नाही तर अगदी आपल्या घरात (Crab Farming At Home) अवघ्या 150 x 100 च्या जागेत 200 खेकड्यांचे संवर्धन Crab Farming) करता येईल असे प्रशिक्षण सुरू केले आहे.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र (Marine Biological Research Station), रत्नागिरी (Ratnagiri) येथे ‘खेकडा पालन व्यवस्थापन’ (Crab Farming Training) या विषयावर दि. 18 ते 20 जुलै, 2024 या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामुळे खेकडा संवर्धनाद्वारे मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, तरुण बेरोजगार स्वत:ची प्रगती साधू शकतील. यामुळे खेकडा उत्पादन वाढीस चालना मिळेल. म्हणूनच या उदात्त हेतूने सदर प्रशिक्षणाचे (Crab Farming) आयोजन करण्यात येत आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या खेकडा प्रकल्पातील संशोधका मार्फत खालील विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल.  

  • तलावातील खेकडा संवर्धन, तलावामध्ये, खाड्यांमध्ये तरंगत्या फायबर खोक्यांमधील खेकडा संवर्धन, खाडीतील पेन कल्चर पद्धतीने खेकडा संवर्धन
  • खेकडा शेतीसाठी बांधकाम आणि आवश्यक यंत्र सामुग्री
  • खेकड्यांच्या विजाची ओळख
  • खेकड्यांचे खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन
  • खेकड्‌याना उद्भवणारे आजार आणि उपाय
  • खेकड्‌यांची सुरक्षित काढणी, बांधणी आणि विक्री व्यवस्थापन
  • प्रकल्प अहवाल याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांचे कडून शास्त्रोक्त माहिती,
  • यशस्वी संवर्धक यांचे अनुभव कथन, प्रकल्प/प्रक्षेत्र भेट केली जाईल.

प्रशिक्षणाचे तपशील (Crab Farming)
नाव नोंदणी लिंक: https://forms.gle/6Fqe3Ew38FDedJBP8
प्रशिक्षण शुल्कः रू. 3000/-

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. सुरेश नाईक 8275454821

डॉ. हरिष धमगये 9511295814