Diseases And Pest Attack On Chilli Crop: मिरची पिकावर बोकड्या या व्हायरस रोगासोबतच आता अळीचेही आक्रमण! शेतकरी हैराण  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मिरची उत्पादक शेतकरी (Diseases And Pest Attack On Chilli Crop) सध्या पिकावर  येणाऱ्या रोग आणि किडीमुळे अडचणीत सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वासडी (ता. कन्नड) परिसरामध्ये उन्हाळी पिकावर आलेल्या बोकड्या/ कोकडा या व्हायरसमुळे (Chilli Leaf Curl) त्रस्त असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. व्हायरस पाठोपाठ मिरचीवर (Virus Attack On Chilli) अळीचाही हल्ला (Diseases And Pest Attack On Chilli Crop) झाला असून, शेतकर्‍यांचे उरलेसुरले अवसानही यामुळे गळाले आहे. त्यामुळे लागवड खर्चही (Production Cost) निघतो की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

कन्नड तालुक्यात यंदा मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी उन्हाळी मिरचीची लागवड (Summer Chilli Cultivation) केली आहे. चांगले उत्पन्न मिळून आर्थिक हातभार लागेल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. कडक उन्हातही आहे त्या पाण्यावर नियोजन करून हे पीक शेतकर्‍यांनी जगवले. मात्र सुरुवातीपासून या पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला (Diseases And Pest Attack On Chilli Crop).

त्याला प्रतिबंध करण्यासाठी शेतकर्‍यांनी अनेक प्रकारची महागडी औषधे (Expensive Insecticide) फवारली, मात्र तो आटोक्यात आला नाही. परिणामी मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यातच आता पुन्हा मिरचीवर (Chilli Crop) अळीने हल्ला केला आहे (Diseases And Pest Attack On Chilli Crop). यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांचे उरलेसुरले अवसानही गळून गेले आहे. पुन्हा खर्च करून शेतकरी महागड्या औषधांची मिरचीवर फवारणी करत आहेत.

मात्र अळी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकर्‍यांची मिरची निघायला सुरूवात झाली आहे, मात्र मिरचीच्या आत हिरवी अळी (Fruit Borer) असल्याने या मिरचीला बाजारात भाव मिळेनासा झाला आहे (Diseases And Pest Attack On Chilli Crop).

रामनगर येथील शेतकरी संजय गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. अडीच महिने झाल्यानंतर पहिली तोडणी करताच त्यावर व्हायरसचा अटॅक झाला आणि 80 टक्के पीक धोक्यात आले आहे. विविध प्रकारच्या फवारणी करूनही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दीपक खुर्दे यांची अर्धा एकर मिरची आणि भारंबावाडी येथील जयलाल राठोड यांचे 50 गुंठे क्षेत्रावरील मिरची पीक व्हायरस व अळीला बळी पडले आहे (Diseases And Pest Attack On Chilli Crop).