Hello Krushi App : ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईलवर कसे पाहायचे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Hello Krushi App
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Krushi App: आपल्याला बऱ्याचदा ग्रामपंचायतमधून अनेक दाखल्यांची आवश्यकता भासत असते. यामध्ये जन्मदाखला, मृत्यू दाखला, घरपट्टी, विवाह नोंदणी दाखला, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे या दाखल्यांचा समावेश होतो. अनेक सरकारी योजना/कामे यांकरिता सदरील दाखले अनिवार्य असतात. आपल्याला अचानक याची गरज भासल्यास ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपल्याला ते काढावे लागतात. यासाठी आपला वेळ जातो त्याच बरोबर आपल्याला अनेक फेऱ्या देखील माराव्या लागतात. मात्र आता ग्रामपंचायतचे हे दाखले तुम्ही मोबाईलवर पाहू शकणार आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे दाखले मोबाईलवर कसे पाहायचे त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. Gram Panchayat Dakhale

मोबाईलवर दाखले पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

1) सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi नावाचे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा.

2) आता यामध्ये जमीन मोजणी, रोजचे बाजारभाव, सातबारा, शेतकरी दुकान, हवामान अंदाज अशा अनेक सेवा दिसतील. यातील सरकारी योजना विभाग निवडा. आता ग्रामविकास विभाग दाखले ऑनलाईन काढा असा पर्यायाची निवड करा.

3) आता तुम्हाला इथे खालच्या बाजूला अर्ज करा असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

4) ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तालुका आणि तुमचे गाव किंवा जी ग्रामपंचायत आहे ती निवडावी लागेल आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल

5) यानंतर तुमचा ग्रामपंचायत चे पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बरेच ऑप्शन दिसतील जसे की, दाखले, कर भरणे वगैरे यामधील तुम्हाला दाखल्याबाबत माहिती घ्यायची असेल तर दाखले/ प्रमाणपत्र यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तो दाखला मिळून जाईल.