वाढतेय पर्यावरणपूरक हॉटेल्सची मागणी; कृषी पर्यटनासाठी ठरतो आहे चांगला पर्याय

Banasura Hill resort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । पर्यावरणप्रेमी लोक कोठेही बाहेर फिरायला जातांना नेहमी पयर्टन स्थळांजवळील चांगले. स्वच्छ, शांत आणि हिरवळीने भरपूर असलेल्या हाॅटेल्स किंवा रिसाॅर्टच्या शोधात असलेले पाहायला मिळतात. यामुळे बाहेर फिरून आल्यावर हॉटेलमध्ये आराम, आणि पर्यटन स्थळी फिरण्याचा भरपूर आनंद घेता येतो. अश्या हिरवळीने माखलेल्या पर्यावरण पूरक हॉटेलबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शेतातील खोल्यांसाठी केरळ राज्यातील वायनाड येथील बनासुरा हिल रिसॉर्ट बाणासुरा रिसॉर्ट हे प्रसिध्द आहे. स्थानिक मातीपासून या खोल्या बनविलेल्या आहेत. यामधील सर्व खोल्या इको-फ्रेंडली आहेत त्यामुळे एक वेगळेच समाधान आणि आनंद पर्यटकांना मिळतो. हा रिसार्ट 35 एकरांवर पसरलेला आहेत. हॉटेलच्या सर्व बाजूला असलेली हिरवळ आपल्या डोळ्याचे पारणे फेडते. वाटेत सापडणारे धबधबे, गुहा आणि आदिवासी वस्त्यांचे सौंदर्य आणि हॉटेलवरून दिसणारे गाव खूपच आनंदी माहोल तयार करते.

हे अनोखे रिसॉर्ट तयार करण्यासाठी संपूर्णपणे लाकडाचा वापर केला आहे. नैसर्गिक प्रकाश खूप चांगल्या पद्धतीने वापरला गेल्यामुळे खूप सुंदर अनुभव मिळतो. तर बायो-गॅस, सेंद्रिय कचर्‍याचे पुनर्प्रक्रिया रिसॉर्टमध्ये केला जातो. तसेच किचन देखील बायो-गॅसद्वारे चालविले जाते. येथे कमीतकमी कचरा निर्माण केला जातो. यामुळे येथे पर्यटनासाठी येणे मोठा आनंददायी अनुभव आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा