बियाणेकोंडीवर आता गुणनियंत्रकांचे लक्ष; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचे पाऊल

Seeds
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा- हॅलो कृषी । दरवर्षी शेतकऱ्यांचे बियाणेकोंडीमुळे खूप नुकसान होत असते. म्हणजे शेतकरी शेतात जे पेरतात ते उगवतच नाही. पेरलेले न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागते. कधी-कधी तर पेरणीची वेळी निघून गेलेली असते. अशामुळे उत्पादन क्षमता कमी होते. आता अश्या प्रकारची बियाणेकोंडी थांबवण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यासाठी बुलढाणा जिल्ह्यात 38 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण आणि 14 भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या जिल्ह्यात बियाणांचे 1376, रासायनिक खतांचे 1396 व कीटकनाशकांचे 1340 परवानाधारक वितरक आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग मिळून 38 गुणवत्ता निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

सदोष बियाणांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्या होत्या. पहिल्यांदा पेरणी केलेले बियाणे हे उगवलेच नाही म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. यामुळे उत्पन्नात घट झाली. म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांची ही बियाणेकोंडी थांबवण्यासाठी कृषी निविष्ठांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करण्याची मोहीम आखली आहे. त्यामुळे आता खराब बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार नाही.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7