हॅलो कृषी ऑनलाईन: जूनमध्ये संपलेल्या 2023-24 पीक वर्षात भारताचे अन्नधान्य (Foodgrain Production) उत्पादन विक्रमी 332.22 दशलक्ष टनावर पोहोचले आहे. गहू आणि तांदळाच्या बंपर उत्पादनामुळे (Bumper Production Of Wheat And Rice) हा विक्रम झालेला आहे असे कृषी मंत्रालयाने बुधवारी सांगितले.
वर्ष 2023-24 चा अंतिम अंदाजानुसार मागील वर्षीच्या 329.6 दशलक्ष टन पेक्षा 2.61 दशलक्ष टन जास्त अन्नधान्य उत्पादनात (Foodgrain Production) वाढ झालेली आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
2023-24 यावर्षी उत्पादन विक्रमी उत्पादन 137.82 दशलक्ष टनावर पोहोचले, जे 2022-23 मध्ये 135.75 दशलक्ष टन होते.
गव्हाचे उत्पादनही मागील वर्षीच्या 110.55 दशलक्ष टनाच्या तुलनेत 113.29 दशलक्ष टन इतके उच्चांकी झाले आहे.
मात्र डाळवर्गीय (Pulses Production) आणि तेलबियांच्या उत्पादनात (Oilseed Production) घट झालेली आहे. डाळींचे उत्पादन 26.05 दशलक्ष टन वरून 24.24 दशलक्ष टन आणि तेलबियांचे उत्पादन 41.35 दशलक्ष टन वरून 39.66 दशलक्ष टनावर घसरले आहे.
मंत्रालयाच्या अहवालानुसार कडधान्ये, भरड तृणधान्ये, सोयाबीन आणि कापूस उत्पादनात झालेल्या घसरणीला महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती (Drought Condition) आणि ऑगस्टमध्ये विशेषतः राजस्थानमध्ये दीर्घकाळ कोरडे पडणे हे कारण महत्त्वाचे ठरले.
उसाचे उत्पादन (Sugarcane Production) 490.53 दशलक्ष टनावरून 453.15 दशलक्ष टन झाले आणि कापूस उत्पादन 33.66 दशलक्ष गाठीवरून 32.52 दशलक्ष गाठी (170 किलोच्या 1 गाठी) पर्यंत घसरले.
अन्नधान्याच्या (Foodgrain Production) श्रेणीत तांदूळ, गहू, भरड तृणधान्ये, बाजरी आणि कडधान्ये यांचा समावेश होतो. अन्नधान्य उत्पादनाचा हा अंदाज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.