Free Fruit Seedlings: पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत, गटशेती करणार्‍यांना मिळणार मोफत फळांची रोपे! जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत (Free Fruit Seedlings) गटशेती (Group Farming) करणाऱ्या शेतकर्‍यांना मोफत वृक्ष दिले जाणार आहेत. फळबाग शेती वाढावी या प्रमुख हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहेत.

सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये (Satyamev Jayate Farmer Cup) सहभागी गटातील शेतकर्‍यांना पानी फाउंडेशन (Paani Foundation) व सेट्रिज संस्थेमार्फत (Setridge Institute) मोफत वृक्ष दिले जाणार आहेत. फळबाग शेती (Fruit Farming) वाढावी या प्रमुख हेतूने हा उपक्रम (Free Fruit Seedlings) राबवण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हावे, यासाठी तालुका निहाय प्रशिक्षण घेतल्याची माहिती पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी दिली आहे.

सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेअंतर्गत आयोजित गटशेतीद्वारे आपले उत्पन्न वाढवणाऱ्या व खर्च कमी करणाऱ्या गटांना चालना देण्यासाठी विविध फळांची रोपे मोफत (Free Fruit Seedlings) दिली जाणार आहेत. यामध्ये आंबा, चिकू, मोसंबी, संत्रा, लिंबू, सीताफळ, जांभूळ, पेरू इत्यादी फळांच्या रोपांचा समावेश करण्यात आलेला आहे. बांधावर लागवड करायची असेल तर मोहगणी व सागाची रोपेही मोफत दिली जाणार आहेत.

गटशेती करणाऱ्या शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त फळपिकांची लागवड करून पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन पैसा देणारी फळपिकांची लागवड (Free Fruit Seedlings) करावी, असे आवाहन संतोष शिनगारे यांनी केले आहे. एकत्रित फळबाग लागवड करण्यासाठी या गटांना एकदिवसीय प्रशिक्षणही (Training For Farmers) देण्यात आले आहे.

2200 शेतकर्‍यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शेतकर्‍यांनी खड्डे खोदायला सुरुवात केली असून, लवकरच रोपे (Free Fruit Seedlings) लागवड करण्यात येणार आहेत. रोपांसाठी लागणार्‍या पाण्याचे नियोजन शेतकर्‍यांनी करणे गरजेचे आहे. रोपांचा खड्डा कसा खोदावा, तो कसा भरावा, रोपांची लागवड कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

लवकरच फळपिकांवर आधारित विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने ऑनलाइन डिजिटल शेती शाळाही सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत एक लाख रोपे लागवड करून ते जगवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन पानी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, सीईओ सत्यजित भटकळ यांनी केले आहे.

या गावांचा असेल सहभाग

पहिल्या टप्प्यातील प्रयोगासाठी बीड जिल्ह्यातील बीड, केज, धारूर, अंबाजोगाई, आष्टी,

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पानी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे (Free Fruit Seedlings) .

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.