सांगलीत डाळिंबाच्या बागेत गांजाची शेती; 13 लाख रुपयांचा गांजा जप्त

sangli news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ओनलाईन : हल्ली तातडीने आणि जास्त प्रमाणात पैसे कमवण्याच्या नादात अवैध मार्गाचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. जास्त कमाई करण्याच्या मोहापायी सांगलीत डाळिंबाच्या बागेत चक्क गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी धाड टाकून ही गांजाची झाडे जप्त केली आहेत. १३३ किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत १३ लाख आहे.

१३ लाखांचा ओला गांजा जप्त

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , ही घटना सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील आहे. माणिकनाळ येथील महासिद्ध लक्ष्मण बगली यांच्या शेतातील डाळिंबाच्या बागेत पोलिसांनी छापा टाकून तेरा लाख 39 हजार 100 रुपयांचा 133 किलो 91 ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे.

५-६ फूट उंच वाढली होती झाडं

माणिकनाळ या गावामध्ये महासिद्ध लक्ष्मण बगली हा त्याच्या कुटुंबा समवेत राहतो. डाळिंबाच्या शेतातील गांजाची लागवड केली असल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी बगली याच्या शेतात छापा टाकला त्याच्या डाळिंब बागेत पाच ते सहा फूट उंचीची गांजाची लहान-मोठे झाडं सापडली त्याचे वजन सुमारे 133 किलो आणि 91 ग्रॅम होते. तर त्याची किंमत 13 लाख 39 हजार 100 रुपये इतकी आहे.
याबाबतची फिर्याद हवालदार श्रीशैल वळसंग यांनी दिली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पंकज पवार करत आहेत.