Ginger Market: आले प्रतवारी व खरेदीचा तिढा शेवटी सुटला! काय झाला ठराव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यात (Ginger Market) सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये (Satara Bajar Samiti) शेतकरी आणि व्यापार्‍यांच्या बैठकीत प्रतवारी (Ginger Grading) न करता जुने आणि नवे ‘आले’ सरसकट खरेदी (Ginger Purchase) करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला (Ginger Market).

सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापार्‍यांकडून (Market Traders) मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत होते. यावर तोडगा काढण्यासाठी सातारा बाजार समितीने (Ginger Market) रविवारी व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक आयोजित केली.

बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी सांगितल्या.

व्यापार्‍यांकडून नवीन व जुन्या आल्याच्या दरात (Ginger Rate) मोठी तफावत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तसेच व्यापार्‍यांनी आले खरेदीनंतर 30 टनापर्यंत गाडी भरण्याची वाट न पाहता 12 टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, जेणेकरून तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणी शेतकर्‍यांनी केली.

बैठकीत खरेदीदार व्यापार्‍यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मान्य केले. शेतकर्‍यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले शेतमाल बाजार समितीतील (Ginger Market) अधिकृत परवानाधारक व्यापार्‍यांनाच विकावा.

व्यापार्‍याने सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास व्यापार्‍याचा परवाना रद्द करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले.

अधिकृत व्यापार्‍यांना शेतमाल विकण्याचे आवाहन
बाजार समितीचा परवाना नसलेल्या काही जणांकडून सौंदर्यात शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकर्‍यांनी अधिकृत व्यापार्‍यांना शेतमाल विकण्याचे आवाहन सभापती विक्रम पवार यांनी केले आहे. परवानाधारक नसणाऱ्यांना शेतमाल विक्री केल्यास झालेल्या फसवणुकीला बाजार समिती (Ginger Market) जबाबदार राहणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

लाखोंची उलाढाल
सातारा जिल्ह्यात आले पिकाची लागवड (Ginger Crop Cultivation) 3 हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रात होते. साधारणतः एका हेक्टर मागे 50 क्विंटलपर्यंत या पिकाचे उत्पादन निघते. यातून लाखो रूपयांची उलाढाल होते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.