हॅलो कृषी ऑनलाईन: गोकुळने दूध (Gokul Dudh) संकलनानुसार अनुदानात (Subsidy) 10 ते 15 हजार रूपयांची भरघोस वाढ केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी दिली. प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी तसेच त्यांच्या संस्था इमारत बांधकाम इत्यादीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
‘गोकुळ’ने दूध (Gokul Dudh) उत्पादकांबरोबरच (Dairy Farmers) प्राथमिक दूध संस्थांच्या (Dudh Sangh) बळकटीसाठी प्रयत्न केले आहेत. संस्थांच्या इमारतीसाठी संघ अनुदान देते, या योजनेमध्ये गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था नवीन इमारत, जुनी इमारत खरेदी अथवा दुसरा मजला व स्वमालकीच्या इमारत शेजारी बांधकाम केल्यास अशा संस्थांना संकलनानुसार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
परंतु इमारत बांधकामासाठी लागणारे साहीत्यांचे दर वाढलेले आहेत व महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधणीसाठी किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे. यासाठी अनुदान वाढीचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगीतले. 1 ते 400 लीटर पर्यंत दहा हजार तर त्यापुढे 15 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
असे मिळणार अनुदान
दूध संकलन लीटर – एकूण अनुदान
1 ते 100 – 32 हजार
101 ते 200 – 37 हजार
201 ते 300 – 40 हजार
301 ते 500 – 45 हजार
501 पासून पुढे – 50 हजार
आतापर्यंत 2.38 कोटींचे अनुदान वाटप
‘गोकुळ’ ने (Gokul Dudh) 1990 पासून ही योजना सुरू केली असून आतापर्यंत 915 दूध संस्थांना 2 कोटी 38 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान दिले आहे. 2010 पूर्वी अनुदानाचा लाभ घेतलेल्या संस्थांना मागील दिलेले अनुदान वजा करून शिल्लक रक्कम दुसरा मजला अनुदान म्हणून अदा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगीतले.