हॅलो कृषी ऑनलाईन: आतापर्यंत पैशाचे एटीएम बघितले आहे. परंतु आता धान्याचे एटीएम (Grain ATM) सुद्धा सुरू झाले आहेत हे तुम्हाला माहित आहे का? होय ओरिसा (Odisha) या राज्यात पहिले ‘धान्याचे एटीएम’ सुरू झाले असून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (PDS) लाभार्थ्यांना 24×7 म्हणजेच 24 तास केव्हाही आणि कोणत्याही दिवशी याचा लाभ घेता येणार आहे. ‘अन्नपूर्ती ग्रेन एटीएम’ (Annapurti Grain ATM) चे भुवनेश्वरमध्ये (Bhubaneshwar) अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री कृष्ण चंद्र पात्रा (Krushna Chandra Patra) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
भारतातील जागतिक अन्न कार्यक्रमाचे (WFP) उप-देश संचालक नोझोमी हाशिमोटो यांनी सह भागीदारीत महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून ही मशीन (Grain ATM) त्यांना पाठवली असे कृष्ण चंद्र पात्रा यांनी सांगितले. डब्ल्यूएफपीच्या भागीदारीतील धान्य वितरण यंत्राचे वर्णन करताना, पात्रा म्हणाले की यामुळे राज्यात पोषण सुरक्षा प्राप्त करण्यास मदत होईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 24×7 प्रवेशासह लाभार्थ्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी योग्य वेळी राज्यभर एटीएमची (Grain ATM) स्थापना केली जाईल, असेही मंत्री कृष्ण चंद्र पात्रा यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक आणि त्यानंतर राज्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये अशी किमान एक सुविधा उभारण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी हाशिमोटो म्हणाले की “ओरिसाने मिळवलेले यशाची जागतिक पातळीवर नोंद होणार. अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेले जागतिक स्तरावर पुरस्कृत केलेले अन्नपूर्ती सोल्यूशन पाहून आम्हाला आनंद झाला आहे. वर्षभर चालणारे पायलट आणि चाचण्या यामुळे अधिक कार्यक्षम वैशिष्ट्ये असलेली प्रणाली विकसित होत आहे”
वैध पीडीएस रेशनकार्ड असलेले कोणीही, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोक (UT) त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून या तंत्राचा लाभ घेऊ शकतात. या मशीनमध्ये फक्त 0.01 टक्के त्रुटी (Machine Error) आहे. पाच मिनिटांत 50 किलो पर्यंत धान्य वितरित करण्याची क्षमता या मशीनमध्ये (Grain ATM) आहे.