हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्यांना (Basmati Rice Varieties) कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगले उत्पादन मिळावे या उद्देशाने पुसा संस्थेने तांदळाच्या 2 नवीन जाती (Pusa Rice) प्रसिद्ध केल्या आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली (IARI) यांनी रॉबिन वीड बासमती तांदळाच्या (Robin Weed Basmati Rice), पुसा बासमती 1979 (Pusa Basmati 1979) आणि पुसा बासमती 1985 (Pusa Basmati 1985) या जाती (Basmati Rice Varieties) 22 मे 2024 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत.
थेट बियांच्या लागवडीसाठी वापरता येणारे हे वाण इमाझेथापीर 10% SL या तणनाशकास सहनशील (Herbicide Tolerant Rice) आहेत. या संदर्भात, IARI, दिल्लीचे संचालक डॉ. अशोक कुमार सिंह म्हणाले की, उत्तर-पश्चिम भारतातील भात लागवडीतील (Rice Cultivation) प्रमुख चिंता म्हणजे कमी होत जाणारी पाण्याची पातळी, भात रोपणासाठी मजूरांची कमतरता आणि पूर लागवड करताना हरितगृह वायू, मिथेनचे उत्सर्जन यासारख्या समस्येवर पुसा संस्थेने विकसित केलेला थेट पेरणी केलेला भात (Basmati Rice Varieties) हा या सर्व समस्यांवर उपाय आहे.
DSR (Direct Seeded Rice) अंतर्गत तण ही एक मोठी समस्या आहे. या दिशेने, ICAR-IARI, नवी दिल्ली येथे एकत्रित संशोधनामुळे रॉबिन वीड बासमती तांदळाच्या दोन जाती, पुसा बासमती 1979 आणि पुसा बासमती 1985 जाती (Basmati Rice Variety)विकसित झाल्या आहेत. हे वाण प्रथमच गैर-जीएम तनाशी इमॅजेथापीर 10%SL ला प्रतिरोधक बासमती तांदळाच्या जाती (Basmati Rice Varieties) आहेत. या जाती भारतात व्यावसायिक लागवडीसाठी प्रसारित केल्या जातील.
पुसा बासमती 1979
पुसा बासमती 1979 ही तणनाशकास सहनशील जात आहे. या जातीत इमाझेथापीर 10% SL सहन करणारे AHAS एलील आहे. या जातीचा बियाणे परिपक्वता कालावधी 130 ते 133 दिवस आहे. नॅशनल बासमती चाचण्यांच्या 2 वर्षांच्या चाचण्या दरम्यान बागायती पद्धतीने लागवड केल्यास याचे सरासरी उत्पादन 45.77 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
पुसा बासमती 1985
पुसा बासमती 1985 देखील बासमती तांदूळ “PB 1509” च्या MAS पासून विकसित एक तणनाशक सहनशील जात आहे. तांदळाच्या या जातीमध्ये सुधारित AHAS एलील आहे ज्यामुळे हे इमाझेथापीर तणनाशकास सहनशील आहे. या जातीचा बियाणे परिपक्वता कालावधी 115 ते 120 दिवस आहे. राष्ट्रीय बासमती चाचण्यांमध्ये 2 वर्षांच्या चाचणी दरम्यान सिंचन केलेल्या पुनर्लावणीच्या स्थितीत त्याचे सरासरी उत्पादन 5.2 टन प्रति हेक्टर आहे.
भाताची थेट बियाणे पेरणी (DSR) अंतर्गत या दोन भाताच्या वाणांची (Basmati Rice Varieties) लागवड पद्धती तसेच या दोन पिकांच्या वाणांमधील तणांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या दोन जाती, ब्रॉड-स्पेक्ट्रम तणनाशकांना सहनशील असल्याने, इमाझेथापीर 10% SL DSR अंतर्गत तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतील, ज्यामुळे बासमती तांदूळ लागवडीचा खर्च कमी होईल. यामुळे भात शेतीतील मजूरांची कमतरता, पाणी आणि मिथेन उत्सर्जन या आव्हानांवर मात करण्यात मदत होईल.