Abhijit Patil : अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी, चार कारखान्यांची तपासणी सुरु

abhijit Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील साखर कारखानदारीतील एक मोठं नाव म्हणजे अभिजीत पाटील (Abhijit Patil ) . मात्र अभिजित पाटील यांच्या कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अभिजित पाटील हे मूळचे पंढरपूर येथील रहिवासी आहेत. अभिजीत पाटील यांचे अनेक साखर कारखाने आहेत. पाटील यांनी काहि दिवसांपुर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत ते कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह आयकर विभागाकडून पाटील यांच्या पंढरपूर, उस्मानाबाद, धाराशिव अशा अनेक ठिकाणच्या कारखान्यांवर देखील कारवाई सुरु आहे.

साखर उद्योगामध्ये मोठी खळबळ

दरम्यान अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्यावर सुरु झालेल्या छापेमारीमुळे पंढरपूर जिल्ह्यातील साखर उद्योगामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही छापेमारी सुरु असताना त्यांच्या ऑफिसबाहेर मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाची धाड पडली आहे. आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे. अभिजीत पाटील हेच या कारखान्याच्या चेअरमन आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या घरासह ऑफीस, कारखाने आणि पतसंस्थांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आयकर विभागाने सुरु केलेल्या या छापेमारीमुळे पंढरपूरातील कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.