हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्यात जनजागृती करण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी (Krushi Sanjivani Pandharwada) पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh Jayanti) यांची 125 वी जयंती निमित्ताने दि. 17 जून 2024 ते दि. 01 जुलै 2024 या कालावधीत ‘कृषी संजीवनी’ पंधरवडा (Krushi Sanjivani Pandharwada) आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती निमित्ताने आयोजित या पंधरवड्याची सुरुवात 17 जून पासून होणार असून सांगता 1 जुलैला म्हणजेच वसंतराव नाईक (Vasantrao Naik Birth Anniversary) यांच्या जन्मदिनी होणार आहे. 1 जुलै हा महाराष्ट्रात ‘कृषि दिन’ (Krushi Din) म्हणून साजरा केला जातो.
त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात (Maharashtra) या पंधरवड्यामध्ये (Krushi Sanjivani Pandharwada) प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयावर मुद्द्यांवर शेतकर्यांमध्ये जनजागृती (Farmer Awareness) करणे हा या कृषि संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाचा उद्देश राहणार आहे.
या कालावधीत प्रत्येक दिवशी खाली नमूद केलेल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन “कृषी संजीवनी पंधरवडा (Krushi Sanjivani Pandharwada) साजरा करावयाचा आहे. संपूर्ण राज्यातून एकाच दिवशी एकाच मोहिमेचा प्रचार व प्रसिद्धी होत आहे.
कृषी संजीवनी पंधरवड्याची रूपरेखा खालील प्रमाणे आहे (Krushi Sanjivani Pandharwada)
17 जून 2024 – बीजप्रक्रिया जनजागृती दिन.
18 जून 2024 – पी. एम. किसान उत्सव दिवस
19 जून 2024 – जमिन सुपीकता जागृती दिन
20 जून 2024 – गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन
21 जून 2024 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार
22 जून 2024 – पिक विमा जनजागृती दिन
23 जून 2024 – हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन
24 जून 2024 – सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान दिन
25 जून 2024 – कापूस, भात व ऊस लागवड तंत्रज्ञान दिन
26 जून 2024 – तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन
27 जून 2024 – कृषि महिला शेतकरी सन्मान दिन
28 जून 2024 – जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना
29 जून 2024 – शेतकरी मासिक वाचन दिन व वर्गणीदार वाढविणे
30 जून 2024 – प्रगतशील शेतकरी संवाद दिन
1जुलै 2024 – कृषि दिन