Lightning In Rain: तुळजापूर तालुक्यातील गावात वीज पडल्यावर शेतातून निघाले निळे पाणी! पहा हा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. यावेळी वीज (Lightning In Rain) पडणे या घटना सगळीकडे पाहायला मिळतात. पण मराठवाड्यातील (Marathwada) धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील (Tulajapur Taluka) मसला गावच्या एका शेतात वीज पडल्यानंतर (Lightning In Rain)त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी (Blue Water In River) वाहू लागले.

ही घटना काल सायंकाळी घडली. वीज पडल्यानंतर (Lightning In Rain) जमिनीतून निळे पाणी वाहू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा व्हिडीओ बघा – वीज पडल्यावर शेतातून निघाले निळे पाणी!

व्हिडिओमध्ये शेतातील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. हे पाणी इतके गडद निळे आहे की ते कृत्रिम रंगासारखे दिसते.

वीज पडल्यानंतर (Lightning In Rain) जमिनीतून निळे पाणी का वाहू लागले याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे आणि पाण्याची चाचणी घेण्यात येत आहे.

मराठवाड्यात वीज पडल्यावर (Lightning In Rain) शेतातून निळे पाणी वाहण्याची घटना अत्यंत विचित्र आहे. या घटनेमागे काय कारण आहे हे भूगर्भ शास्त्रज्ञांच्या (Geologist) तपासणीनेच स्पष्ट होईल.

दरम्यान मराठवाड्यात पावसाला (Monsoon In Marathwada) सुरुवात झाली आहे. धाराशिवसह अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे दुष्काळाने त्रस्त मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यातील दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागले आहे. या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी धरणात 4600 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.