Lumpy Virus : धक्कादायक बातमी! लम्पी व्हायरसमुळे ‘या’ जिल्ह्यात झाला 43 जनावरांचा मृत्यू; सर्वत्र उडाली खळबळ

Lumpy vius
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lumpy virus : मागच्या एक महिन्यापासून लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने हाहाकार घातल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील लम्पीग्रस्त जनावरांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागच्या वर्षी सारखीच जनावरांना लम्पीची लागण होईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान लम्पी व्हायरसमुळे अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या 14 दिवसात 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांची जनावरे डोळ्यादेखत मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.

मागच्या काही दिवसापासून लम्पी आजार झपाट्याने पसरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील हा आजार चांगलाच पसरला आहे. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील लम्पीग्रस्त जनावरांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 43 हून अधिक जनावरे या आजाराने दगावली आहेत. तर जूनपासून या आजाराने 55 गुरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून लम्पी रोगाची लागण जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या गुरांची काळजी घ्यावी असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. (Lumpy virus)

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

आपल्या जनावरांचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. त्याचबरोबर सरकारवर गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी केले आहेत मागच्या काही दिवसापूर्वी कोल्हापूर मध्ये अनेक गाईंचा मृत्यू झाला होता मात्र याकडे पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वेळोवेळी लसीकरण न केल्याने जनावरांना लम्पी लागण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी मित्रांनो तुमच्या जनावरांनाही लम्पीची लागण झाली असेल आणि तुम्हाला सरकारकडून याची मदत घ्यायची असेल तर तुम्ही Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व सरकारी मदत मिळू शकतात तेही अगदी मोफत. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि हे ॲप इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती मिळेल. हे ॲप आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून बनवले आहे.

लम्पी आजाराची प्रमुख लक्षणे कोणती?

  • या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
  • लसिकाग्रंथीना सूज येऊन जनावरांना ताप येतो.
    तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
  • चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
  • डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
  • पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
  • दुधाचे प्रमाण कमी होते.
  • हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.