हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) करण्यासाठी 1 हजार 991 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प (Solar Power Generation Project) निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी 900 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी देण्यात आले होते.
त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 276 उपकेंद्रांसाठी एकूण 1 हजार 991 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 98 उपकेंद्रांसाठी 867 मेगावॉटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) .
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेत (2.0) (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) पुणे विभागातील 710 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे (Daytime Power Supply To Farmers) नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 5 हजार 915 मेगावॉट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य असून, आतापर्यंत 7 हजार 669 एकर शासकिय जमिनीचे अधिग्रहण (Acquisition Of Government Land) करण्यात आले आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात 276 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी 1 हजार 991 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) 276 उपकेंद्रांच्या परिसरातील हजारो शेतकर्यांना शेतीसाठी दिवसा व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायत व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात 54 उपकेंद्रांसाठी 429 मेगावॉट, सातारा जिल्ह्यातील 39 उपकेंद्रांसाठी 208 मेगावॉट सांगली 41 उपकेंद्रांसाठी 317 मेगावॉट, कोल्हापूर 44 उपकेंद्रांसाठी 170 मेगावॉट आणि सोलापूर जिल्ह्यातील 98 उपकेंद्रांसाठी 867 मेगावॉट असे 276 उपकेंद्रांसाठी 1991 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सी कडून सुरू आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच लाख प्रति वर्ष असे तीन वर्षांत 15 लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ते 25 वर्षे चालवणे आणि देखभाल व दुरूस्ती करणे याद्वारा राज्याच्या ग्रामीण भागात अंदाजे 6 हजार पूर्ण वेळ, तर 13 हजार अर्धवेळ रोजगार निर्माण (Employment Generation) होतील. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित केले जातील, अशा ग्रामपंचायतींना अंदाजे 200 कोटींपेक्षा जास्त अनुदान (Gram Panchayat Grant) मिळणार आहे.