Mumbai Krushi Utpanna Bajar Samiti: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने एका वर्षात केले 117 कोटीचे उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने (Mumbai Krushi Utpanna Bajar Samiti) 2023 – 24 मध्ये 117 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. गतवर्षीपेक्षा 11 कोटी जास्त महसूल मिळविण्यास प्रशासनाला यश आले आहे.

आशिया खंडातील (Asia) सर्वांत मोठी बाजार समिती (Biggest Bajar Samiti) म्हणून ओळख असलेल्या मुंबई बाजार समितीमध्ये (Mumbai Krushi Utpanna Bajar Samiti) वर्षाला 8 ते 10 हजार कोटी रूपयांची उलाढाल होते.

कांदा, मसाला, धान्य, फळ व भाजीपाला या पाच प्रमुख बाजारपेठांचा बाजार समिती आवारात समावेश होतो. 2022 – 23 मध्ये बाजार फी व इतर मार्गाने बाजार समितीला (Mumbai Krushi Utpanna Bajar Samiti) 106 कोटीचे उत्पन्न झाले होते. यामध्ये वाढ करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

वर्षभरात 117 कोटीचे उत्पन्न प्राप्त केले आहे. यामध्ये बाजार फीच्या माध्यमातून 87 कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे. यापूर्वी 2014 मध्ये बाजार फी च्या माध्यमातून 84 कोटी रुपये मिळवण्यात आले होते.

शासनाने फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा शेतमालाचे (Agriculture Produce) नियमन फक्त मार्केटपुरते मर्यादीत केले आहे. सुकामेवा, साखर, रवा, मैदासह अनेक वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. यानंतरही महसूल वाढविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

वर्षभरात शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची 45 लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात यश आल्याची माहिती बाजार समिती (Mumbai Krushi Utpanna Bajar Samiti) प्रशासनाने दिली आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.