हेलो कृषी ऑनलाईन : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (NAMO Shetkari Scheme) माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति वर्षी तीन हप्त्यामध्ये 6000 रु. अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 4 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी (NAMO Shetkari Scheme) 2254.96 कोटी रुपयांचा निधी
राज्यातील शेतकरी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या 5व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 5व्या हप्त्याच्या अनुदानासाठी 2254.96 कोटी रुपयांचा निधी वितरणास आज (30 सप्टेंबर 2024) च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली देण्यात आली आहे.
PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार वितरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 5 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे अनुदान वितरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.