New Cashew Variety: कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली ओल्या काजू गरासाठी विशेष जात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, (New Cashew Variety) प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे 15 वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजू गरासाठी उपयुक्त ‘वेंगुर्ला-10 एमबी’ (Vengurla 10 MB Cashew) या काजूच्या नवीन वाणाची (New Cashew Variety) लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

हे वाण निवड पद्धतीने (Selection Method For Variety Development) विकसित करण्यात आले आहे. या वाणामध्ये टरफलातील तेल कमी, टरफलाची जाडी मध्यम व काजूगर काढण्यास सुलभ आहे. ही विकसित केलेली नवीन जात (New Cashew Variety) शेतकर्‍यांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणार आहे.

कोकणात ओल्या काजू गराला (Wet Cashew Nut) बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये ओल्या काजू गराचा वापर केला जातो. त्यामुळे या ओल्या काजू गराला बाजारात खूप मागणी असते. ओले काजूगर हंगामात 300 ते 400 रूपये शेकडा दराने मिळतात.

ओल्या काजूगराचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतो. अन्य जातीच्या काजूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात चीक असतो व त्यांची सालही जाड असल्यामुळे बियांमधून काजूगर काढणे फार अवघड असते.

कोकणातील ओल्या काजू गराची वाढती मागणी व ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन ‘वेंगुर्ला 10 एमबी (New Cashew Variety) या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या वाणाच्या काजू बीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्यामुळे काजूगर काढण्यासाठी कमी वेळ खर्च होतो.

त्यामुळे इतर वाणांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त काजूगर मिळतात. पर्यायाने मजुरीत बचत होते. ओल्या काजू बीमधील ओल्या काजूगराचे प्रमाण 32 टक्के असल्यामुळे एकूण ओल्या काजूगराचे प्रति झाड उत्पादन वाढते. हे वाण (Wet Cashew Nut Variety) चालू वर्षात प्रसारित झाल्यामुळे या वाणाची (New Cashew Variety) कलमे शेतकर्‍यांना पुढील वर्षापासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे उपलब्ध होतील.

ही जात (New Cashew Variety) विकसित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Dr. BSKKV Dapoli) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. महेंद्र गवाणकर आणि डॉ. मोहन दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.