Potato Variety: बटाट्याचे ‘हे’ वाण दुष्काळ आणि पूर स्थितीला तोंड देऊ शकेल! वैज्ञानिकांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्हाला जर अस पीक (Potato Variety) घेता आलं की जे दुष्काळ असो की पूर कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहील. त्या पि‍कावर कोणत्याही किडी आणि रोगाचा प्रार्दुभाव देखील होणार नाही आणि लागवड खर्च सुद्धा अगदी अल्प येईल. खरं वाटत नाही ना?

परंतु संशोधकांनी बटाट्याचे असे एक वाण (Potato Variety) तयार करण्याचा दावा केलेला आहे, की जे पिकांवर पडणार्‍या साथ रोगांचा सामना तर करूच शकेल त्याचबरोबर दुष्काळालाही तोंड देऊ शकेल. हे वाण क्षारयुक्त जमिनीतही घेता येईल असे संशोधकांचे म्हणणे आहे. या वाणाविषयी आपण या लेखातून अधिक माहिती घेऊ.

1845 मध्ये आयर्लंडमध्ये बटाट्यावरील “लेट ब्लाइट” (Potato Late Blight) या रोगामुळे तेथील पूर्ण पीक नष्ट झाले होते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंजाबच्या काही भागात या रोगाने कहर केला होता. काही भागात तर या रोगामुळे बटाट्याचं (Potato Variety) 80 टक्के पीक नष्ट झालं होतं.

या रोगाचा जीवाणू उष्ण वातावरणात वेगाने पसरतो. मागील काळात पेरूतील अॅंडीज पर्वतरांगेतील उंच प्रदेशात हवामान उष्ण झाल्यामुळे या जिवाणूमुळे तिथले बटाट्याचं पीक (Potato Crop) नष्ट झालं आहे.

‘पेरू’ (Peru) येथे बटाट्याच्या उत्पादनावर संशोधन करणाऱ्या इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर (International Potato Center) या संशोधन संस्थेचे वैज्ञानिक, स्वत:हून ‘लेट ब्लाइट’ रोगाचा सामना करू शकेल अशी बटाट्याची नवी जात (Potato Variety) शोधण्याचा (Potato Research) प्रयत्न करत आहेत.

बटाट्याची नवी जात : माटिल्डे (Matilde Potato)

वैज्ञानिक बटाट्याच्या अशा वन्य जातींच्या (Potato Variety) वैशिष्ट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते ज्या जातींची लागवड केली जात नाही.

वैज्ञानिकांना बटाट्याच्या काही वन्य जातींमध्ये या रोगाशी लढण्याचे गुण आढळल्यानंतर त्यांनी बटाट्याची वन्य जात आणि शेतीत लागवड केली जाणारी जात यामध्ये क्रॉस ब्रीडिंग (Potato Cross Breeding) केलं आणि या माध्यमातून बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती विकसित केल्या.

वैज्ञानिकांच्या या नव्या शोधाचा परिणाम म्हणजे ‘माटिल्डे’ (Matilde Potato). ही बटाट्याची नवी जात (Potato Variety) असून त्याला वैज्ञानिकांनी 2021 मध्ये प्रसारित केली होती. या जातीच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना आता वेगळ्या कीटकनाशकांची आवश्यकता नसते. कारण बटाट्याच्या या जातीवर ‘लेट ब्लाइट’ रोगाचा (Late Blight Resistant Potato) परिणाम होत नाही.

बटाट्याच्या या नव्या जातींच्या चाचणीसाठी स्थानिक शेतकर्‍यांची मदत घेण्यात आली. त्या शेतकर्‍यांनी फार छोट्या प्रमाणात या नव्या जातींची लागवड केली. यानंतर या शेतकर्‍यांनी सांगीतलं की त्यांना कोणत्या प्रकारच्या जातीची लागवड करू इच्छितात आणि त्यांना कोणत्या जातीचा बटाटा खायला आवडेल.

जर्मनीतील बॉन येथे असलेल्या क्रॉप ट्रस्टमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करणारे बेंजामिन किलियन म्हणतात, “एखाद्या विशिष्ट रोगाविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता विकसित करणं सर्वसाधारणपणे सोपं असतं.”

नवीन जातींच्या चाचण्या

माटिल्डे ही बटाट्याची नवी जात विकसित करण्यासाठी क्रॉप ट्रस्ट पेरूतील वैज्ञानिकांबरोबर काम करत होता. याशिवाय ही संस्था इतर अनेक पिकांच्या नव्या जातींवरदेखील काम करते आहे.

कोणत्याही एका रोगा संदर्भातील रोगप्रतिकारक क्षमतेची बाब सर्वसाधारणपणे एका जनुकाशी निगडीत असते. मात्र दुष्काळ, जमीन अधिक क्षारपट असणे यासारख्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी वैज्ञानिकांना शंभर पेक्षा अधिक जनुकांना तोंड द्यावे लागते.  

दुष्काळात रोपांनी (Drought Resistant Variety) तग धरावी यासाठी वैज्ञानिक वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणण्याबाबत विचार करतात. उदाहरणार्थ दुष्काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी रोपाला लवकर फूलं येणं, रोपाच्या पानातून पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबवणे, रोपाची मुळे लांब असणे जेणेकरून रोप अधिक पसरू शकेल आणि पाण्यापर्यंत पोहोचू शकेल.