हॅलो कृषी ऑनलाईन: एका पॅरॅलिसिस झालेल्या काळवीटाच्या मादीने (Paralyzed Deer Delivery) शनिवारी दुपारी एका गोंडस पाडसाला जन्म दिला. बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे अगदी खरं आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील ताडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रामध्ये ही घटना घडलेली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी वन विभागाने (Forest Department) उपचारासाठी दाखल केलेल्या या मादी काळवीटची (Paralyzed Deer Delivery) प्रकृती गंभीर असून, पाडस मात्र सुदृढ असल्याची माहिती ‘सर्पराज्ञी’च्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली.
देशात वन्यजीवांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात (Animal Care Center) एका पॅरॅलिसिस झालेल्या हरणीचे काळवीट (Female Antelope) पहिले बाळंतपण (Paralyzed Deer Delivery) झाले.
पॅरॅलिसिस झालेली ही काळवीटाची मादी (Paralyzed Deer Delivery) कामखेडा, ता. जि. बीड येथील शेतकरी काळकुटे यांच्या शेतात घायाळ अवस्थेत चार दिवसांपूर्वी आढळून आली होती. या घटनेची माहिती तेथील युवक सचिन मस्के यांनी वन विभागाला दिली होती. त्यानंतर वन विभागाचे वन रक्षक पवार व राजेंद्र कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन या काळवीटाच्या मादीस ताब्यात घेतले होते.
त्यानंतर पुढील उपचारासाठी विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली या काळवीटाच्या मादीस तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते.
सर्पराज्ञीत उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही काळवीटाची मादी गर्भवती (Paralyzed Deer Delivery) असल्याचे सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या लक्षात आले. त्यानंतर या हरिणीवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले.
आतापर्यंत 300 प्राण्यांचे बाळंतपण (Paralyzed Deer Delivery)
■ 24 वर्षांपासून कार्यरत सर्पराज्ञी केंद्रात आतापर्यंत 300 प्राण्यांचे बाळंतपण सुखरूप झाले आहे.
■ अर्धी पोटात, अर्धी बाहेर अडलेली काळवीट मादी, 150 ते 200 सर्प व अन्य वन्यजीवांचे बाळंतपण झाले आहे.
■ तरस आणि खेकड्याचे सीझरही येथे करण्यात आलेले आहे.