हॅलो कृषी ऑनलाईन: हळद काढणीसाठी आता ट्रॅक्टरचलित हळद काढणी (Turmeric Harvesting Machine) यंत्र विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (PDKV Akola) यांनी हे यंत्र (Turmeric Harvesting Machine) विकसित केले असून यामुळे आता हळद काढणीसाठी लागणार्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे.
या यंत्राला वापरण्यासाठी समितीने मान्यता दिल्याने राज्यासह पश्चिम विदर्भात हळदीचा पेऱ्यात (Turmeric Cultivation Area) वाढ होण्यास आता मदत होणार आहे. शिवाय हळद काढणीसाठी लागणारा वेळ, मनुष्यबळाचा खर्च याची बचत होणार आहे.
हळद हे एक फायदेशीर (Turmeric Crop) पीक असून सुद्धा काढणीसाठी एकूण पीक उत्पादनाच्या खर्चात(Turmeric Production Cost) जवळपास 30 ते 40 टक्क्यापर्यंत खर्च येत असल्याने शेतकरी हे पीक घेताना विचार करतात कारण एकूण उत्पादन खर्चांपैकी या पिकाच्या काढणीला (Turmeric Harvesting Machine) जवळपास आठपट जास्त मजूर लागतात.
हळद पिकाची काढणी (Turmeric Harvesting) मजूरांच्या सहाय्याने केली जाते. या पिकाची व्यावसायिक उपयोगीता बघता हळद काढणी यंत्र (Turmeric Harvesting Machine) प्रभावी ठरणार आहे. या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (PDKV Vice Chanceller) डॉ शरद गडाख (Dr. Sharad Gadakha) यांच्या मार्गदर्शनात शास्त्रज्ञ डॉ. विवेक खांबलकर यांनी हे यंत्र विकसित केले आहे.
सन 2019-20 मध्ये देशात हळद पिकाखाली एकूण 2.18 लक्ष हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी 0.55 लक्ष हेक्टर क्षेत्र फक्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र हे तेलंगणानंतर हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. सन 2021-22 मध्ये राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र सुमारे 84066 हेक्टर होते. हळदीची लागवड आणि काढणीचे काम मोठे जिकरीचे आहे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही मिळणे कठीण होत असल्याने हळदीच्या लागवडीत हा मोठा खोडा होता. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद काढणी यंत्र (Turmeric Harvesting Machine) विकसित केले आहे.
हळद काढणी यंत्राची वैशिष्ट्ये आणि फायदे (Turmeric Harvesting Machine Benefits)
- टॅक्टरचलित हळद काढणी यंत्रामुळे श्रम आणि वेळेची बचत होणार.
- हळद काढणी जलद होणार.
- विशेष म्हणजे गादी वाफ्यावरील हळद काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे.
- या यंत्राची कार्यक्षमता 98.72 टक्के एवढी आहे. या
हे यंत्र मजबूत आणि टिकाऊ असून, वापरण्यास सुलभ आहे.