PM Kisan Yojana: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथे होणार पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याचं वितरण; 20 हजार कोटी जमा होणारशेतकर्‍यांच्या खात्यात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या (PM Kisan Yojana) 18 व्या हप्त्याचा (18th Installment) वितरण सोहळा वाशिम जिल्ह्यात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम (Washim) येथे उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. केंद्र सरकारच्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका हप्त्यात 2 हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये 6 हजारांची रक्कम पाठवते. केंद्र सरकारने ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजारांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आता पीएम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 5 ऑक्टोबरला जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणार आहेत. 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये पाठवले जाणार आहेत. 

या कार्यक्रमाच्या निमित्त्यानेपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईतील मेट्रो 3 चे देखील उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

पीएम किसानची पैसे मिळवण्यासाठी ई केवायसी बंधनकारक 

शेतकऱ्यांना पीएम किसानच्या (PM Kisan Yojana) 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यापूर्वी ई केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. ई केवायसी जे शेतकरी करणार नाहीत त्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. 

PM-KISAN e-KYC प्रक्रियेसाठी खालील स्टेप्सचा अवलंब करा (PM Kisan ekyc)

ज्यांनी अद्याप PM-KISAN e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

  • PM किसानच्या (PM Kisan Yojana) अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/  येथे भेट द्या.
  • होमपेजच्या उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ शोधा.
  • फार्मर्स कॉर्नरच्या खाली असलेल्या बॉक्समध्ये ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा.
  • आधार ई-केवायसी पेजवर जा.
  • तुमचा आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा, नंतर सर्च बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर इनपुट करा आणि “ओटीपी मिळवा” बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका.
  • तुमचे PM KISAN e-KYC यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट फॉर ऑथेंटिकेशन’ बटणावर क्लिक करा.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.